कराड : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या वतीने स्वच्छता व साक्षरता मोहिम सुपने, ता.कराड येथे राबविण्यात आली. सुपने ग्रामपंचायत, ज्ञानदीप सामाजिक संस्था, सुपने विकास सोसायटी आदीं संस्थांतील पदाधिकार्यांसह सभासद, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आदींसह शेतकरी ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वच्छतेचे महत्व व कोरोनाच्या काळात घ्यावयाची दक्षता याविषयी नाबार्ड बँकेच्यावतीने मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी नाबार्ड बँकेचे सातारा जिल्हा प्रमुख सुबोध अभ्यंकर, प्रकाशराव पाटील, सुपने ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक झिंब्रे, उपसरपंच रणजित पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विकास अधिकारी पवार, विकास सोसायटी चेअरमन महादेव पाटील, व्हाईस चेअरमन दादाराम जाधव, माजी चेअरमन संपतराव पाटील, बी.के.पाटील, समृध्दी पाणी पुरवठा संस्थेचे चेअरमन अरुण पाटील, सचिव पकंज नलवडे, सचिव निकम आदींची उपस्थिती होती.
स्वच्छता, साक्षरता मोहिमेला नाबार्ड बँकेचे सातारा जिल्हा प्रमुख सुबोध अभ्यंकर यांनी सर्व ग्रामस्थांना कोरोनाच्या काळामध्ये सुरक्षित अंतर ठेवणे तसेच मास्कचा वापर करणे, साबण व पाण्याने हात स्वच्छ धुणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. तसेच सर्व ग्रामस्थांनी शौचालयाचा वापर करावा व आपल्या गावातील लोकांचे आरोग्य चांगले ठेवावे, असे आवाहन केले.
यावेळी प्रकाशराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. ज्ञानदीप संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात यांनी प्रास्ताविक केले. बाजीराव पाटील यांनी आभार मानले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, सोसायटी पदाधिकारी, अंगणवाडी, आशा सेविका, शेतकरी, ग्रामस्थ होते.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |