12:23pm | Sep 14, 2022 |
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये बुधवारी एक मोठा रस्ते अपघात घडला आहे. पुंछच्या सावजन भागात मिनी बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, इतर तब्बल २० जण जखमी झाल्याची माहिती आहे. सर्व जखमींना तात्काळ मंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. ही बस जम्मू-काश्मीरमधील मंडी येथून सावजनकडे जात असताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. मंडी येथून सावजनकडे जात असताना ही बस खड्ड्यात पडली.
या अपघातानंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक लोकही मदतीसाठी घटनास्थळी पोहोचले. सर्व जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. या अपघातातील मृतांचा आकडाही वाढण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. राज्यपाल मनोज सिन्हा यांनी अपघाताबद्दल शोक व्यक्त केलं आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यासोबतच जखमींना चांगले उपचार देण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
राष्ट्रपतींकडून शोक व्यक्त
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये रस्ते अपघातात लोकांचा मृत्यू दुःखद आहे. पीडितांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करते', असं त्या म्हणाल्या. तर, उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनीही शोक व्यक्त केला आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |