01:17pm | Jun 04, 2021 |
सातारा : गोमांसाच्या अवैध वाहतूक प्रकरणी फलटण शहरातील कुरेशी मोहल्ला, मंगळवार पेठ येथील इरफान याकूब कुरेशी, नय्युम कुरेशी व त्यांच्या पाच साथीदारांविरोधात फलटण शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या प्रकरणातील जिवंत जनावरे व दीड टन गोमांस व त्याची वाहतूक करण्यासाठी लागणारी वाहने असा एकूण 9 लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक भारत किंद्रे यांना अवैध गोमांस वाहतूक प्रकरणी त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने फलटण शहरातील कुरेशी मोहल्ला, मंगळवार पेठ येथे पोलीस पथक पोहोचले असता त्यांना अवैधरित्या गोमांसाची वाहतूक सुरु असलेली दिसून आली. त्या अनुषंगाने त्यांनी 1500 किलो गोमांस, एक विना नंबर महिंद्रा पिकअप, मारुती 800 गाडी, एक मोटर सायकल असा एकुण नऊ लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे संबंधितांविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, फलटणचे पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, सचिन राऊळ, सहा. फौजदार भोईटे, पोलीस हवालदार ठाकूर, पो. ना. चातुरे, पो. ना. सूळ, पो. ना. लावंड, पो. ना. भोसले, पो.ना. वाडकर, पो. कॉ. बडे, पो. कॉ. लोलपोड यांनी केलेली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल कदम करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |