पुसेगाव : शेरेचीवाडी, ता. फलटण येथे गेली 29 वर्षापासून चालू असलेला ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह यावर्षीही अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
दिनांक 12 ऑगस्ट पासून सुरु झालेले सात दिवसांचे हे ज्ञानेश्वरी पारायण शुक्रवार दिनांक 19 रोजी गोपाळकाला करून समाप्त झाले. शेरेचीवाडी (ढवळ) हे गाव सांप्रदायिक वारकरी परंपरा लाभलेले गाव असून या गावांमध्ये आदर्श अशी भजन मंडळांची मोठी परंपरा आहे. गावातील सर्व सार्वजनिक सण हे उत्साहाने व ग्रामस्थांच्या एकजुटीने साजरे केले जातात. गावचे ग्रामदैवत श्री. भवानी मातेची यात्रा ही फलटण तालुक्यातील एक सुपरिचित व सुप्रसिद्ध म्हणून ओळखली जाते. गुढीपाडवा, दसरा, दहीहंडी, तुकाराम बीज, हनुमान जयंती, श्रीराम नवमी हे सार्वजनिक सण सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन अतिशय आनंदाने व नियोजनबद्ध पद्धतीने राबवित असतात. गेले 29 वर्ष या गावामध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा पारायण सोहळा अखंडपणे, निर्विघ्नपणे, अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न होत आहे. मागील दोन वर्षांमध्ये कोरोना महामारीमुळे लहान स्वरूपामध्ये संपन्न झालेला हा सोहळा या वर्षी मात्र मोठ्या उत्साहात साजरा झाला. सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन अत्यंत सूत्रबद्ध व नेटके नियोजन करून यावर्षीचा पारायण सोहळा पार पाडला. यासाठी गावांतील, तालुक्यातील, जिल्ह्यातील तसेच इतर दूरदूरच्या ठिकाणचे प्रवचनकार व कीर्तनकार यांना निमंत्रित करण्यात आले होते. समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यातून संपन्न होत असलेल्या या सोहळ्यासाठी गावातील हनुमान प्रासादिक भजनी मंडळ व माऊली भजनी मंडळ, गावातील सर्व तरुण मंडळे तसेच सर्वच ग्रामस्थ यांचे उत्तम सहकार्य लाभले. या पारायण सोहळ्याचे वारकरी संप्रदायाकडून कौतुक करण्यात आले आहे. पुढील वर्षी 30 वा पारायण सोहळा अशाच उत्साहात संपन्न करणार असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |