03:48pm | May 16, 2020 |
बुध : कोरेगाव तालुक्यातील भाडळे येथील हणमंत अशोक घोरपडे यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना शासनाने ताबडतोब आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात रमेश उबाळे यांनी म्हटले आहे, दि.१४ मे २०२० रोजी हणमंत अशोक घोरपडे हे आपल्या शेतात पेरणीपूर्व मशागतीचे काम करत होते.त्यावेळी त्यांचे शेतीला लागून असलेल्या ट्रान्स्फरमरमधील ताण काढणाऱ्या तारेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जाणून घेऊन त्यांना मुख्यमंत्री सहाययता निधीतून मदत देण्यात यावी.
शेतकरी अशोक घोरपडे यांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे.परंतु त्यांच्या निधनानंतर हे कुटूंब हतबल झाले आहे. घरामध्ये पत्नी, मुले आहेत. त्यांच्या कुटूंबाला आज उपजीविकेचे साधन नाही. कोरोनासारख्या संकटात या कुटूंबातील करता माणूसच कुटूंबातून गेला आहे. आशा परिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहाययता निधीतुन मदत करावी अशी आमची मागणी आहे. असेही उबाळे यावेळी बोलताना म्हणाले. निवेदनाच्या प्रत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांना दिल्या असून सर्व अधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठपुरावा करून मदत मिळवून द्यावी अशी आमची विनंती आहे. असेही उबाळे यांनी नमूद केले आहे. निवेदनावर रमेश उबाळे, भारतीय जनता पार्टी जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस यांची सही आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |