09:17pm | Jan 24, 2022 |
प्रकाश राजेघाटगे
पुसेगाव : सातारा जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्रात यंदा जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येणार्या काही दिवसात होणार आहेत. सध्या सर्कल पुर्नरचना, आरक्षण. सोडती बाकी आहे. विविध पक्षांनी स्थानिक पुढार्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक पुढार्यांना निवडणुकांचे डोहाळे लागले आहेत. उत्सुक उमेदवार पायाला भिंगरी बांधून आपल्या मतदार संघात प्रचार करताना दिसून येत आहेत.
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची आचार संहिता निवडणूक आयोगाने लागू केलेली नाही. तरीदेखील मी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढविणारच अशी खुन गाठ अनेक उत्सुक उमेदवारांनी मनोमनी बांधली आहे. अनेक हौसे - नवसे पुढारी ज्यांनी तब्बल पाच वर्षे गटाकडे फिरकुनही पाहिले नाही ते आता वाड्या वस्त्यावर जाऊन मतांची गळ ग्रामस्यांना घालत आहेत. तसेच मोठ्या स्वाभीमानाने मी गेल्या पाच वर्षांत अमुक केले, तमुक केले असे सांगून पुन्हा मतदार राजाला लाडी गोडी लावताना दिसत आहेत. परंतु चतुर मतदारही विविध प्रश्न उपस्थित करत अनेकांची बोलती बंद करताना दिसत आहेत. यावरून या बनवा बनवीला यंदाच्या निवडणुकीत मतदार निश्चित बळी पडणार नसल्याचे दिसून येत आहेत.
तेव्हा येणारी निवडणूक ही काही विद्दमान जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांना चांगलाच धक्का देणारी ठरणार आहे. अशी तिखट प्रतिक्रिया मतदार राजा व्यक्त करताना दिसून येत आहे. अनेक विद्यामान जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे सदस्य यांनी पाच वर्षात मिळालेला निधी आपल्या गटात खर्च न करता टक्केवारी व चिरीमिरी घेऊन विकल्याच्या जोरदार चर्चा मतदार संघात आहेत. या घडामोडी वरून येणार्या निवडणुकीत काही विद्यमान जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांना विजय संपादन करण्यासाठी अतिशय तारेवरची कसरत करावी लागेल, असे चित्र आज रोजी निर्माण झालेले दिसून येत आहे.
होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या आरक्षण सोडतीसह गट पुर्नरचनेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आरक्षण. सोडत जाहीर झाल्यानंतरच त्या गणातील विशिष्ट जातीच्या उमेदवाराला पक्षाकडून तिकिट दिले जाणार आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीकडे सर्व भावी उमेदवारांसह पुढार्यांचे लक्ष लागून असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय फेरबदल होण्याचीही दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मतदारांसाठी विविध मेजवान्यांना सुरुवात
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उत्सुक उमेदवारांनी मतदारांसाठी आता पासुनच आमरस, सोमरस, रोटी बोटीसह विविध प्रकारच्या मेजवान्यां देण्यास सुरुवात केलीली दिसून येत आहे. काही भावी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य होण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसले आहेत. तर विद्यमान उमेदवार पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे म्हणून जिवाचे रान करताना दिसून येत आहे.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |
किरकोळ वादातून मुलाला दगडाने मारहाण करुन खून |
न्यू इंग्लिश स्कूलच्या शतकोत्तर रोप्य महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम गीते..संगीत संध्या कार्यक्रम |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
मोती चौक परिसरातून सोन्याच्या चैनची चोरी |
महिलेच्या पर्सची चोरी |
एसटी स्टॅन्ड परिसरातील कॅफेवर कारवाई; तिघांवर गुन्हा |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी 20 जणांवर गुन्हा |