10:52am | Sep 21, 2020 |
भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये सोमवारी पहाटे तीन मजली इमारत कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या भयंकर घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून २० जणांना बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आलं आहे. पहाटे सगळे गाढ झोपेत असतानाच इमारत जमीनदोस्त झाली. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातही इमारत दुर्घटना घडली आहे. ठाण्यातील भिवंडीमध्ये एक तीन मजली इमारत पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे भूईसपाट झाली. भिंवडीतील पटेल कंपाऊंडमधील जिलानी अपार्टमेंट ही दुर्घटना घडली आहे. पहाटे तीन ते साडेतीन वाजताच्या सुमारास अचानक इमारत कोसळली. त्यानंतर सर्वत्र आरडाओरड आणि धावपळ सुरू झाली.
इमारत दुर्घटनेनंतर तातडीनं ठाणे महानगर पालिकेच्या पथकासह एनडीआरएफच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मदत कार्य वेगानं सुरू करण्यात आलं. मात्र, परिसरातील सर्तक नागरिकांमुळे २० जणांना इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सकाळी नऊ वाजेपर्यंत दहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
ही इमारत ४३ वर्ष जुनी होती. या तीन मजली इमारतीतील ४० फ्लॅट्समध्ये १५० रहिवाशी वास्तव्यास होते. सदर इमारत धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये नव्हती, असं भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. या घटनेची माहिती मिळताच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन सूचना केल्या.
जखमी व मृतांची नावं
१) फातमा जुबेर बबू (स्त्री- २ वर्ष मयत)
२) मोमीन शमिउहा शेख (पु. ४५ वर्ष जखमी)
३) कौंसर सीराज शेख (स्त्री २७ वर्ष जखमी)
४) रुकसार जुबेर शेख (स्री २५ वर्ष जखमी)
५) फातमा जुबेर कुरेशी (स्री ८ वर्ष मयत)
६) उजेब जुबेर (पु. ६ वर्ष मयत )
७) असका म. आबीद अन्सारी (स्री १४ वर्ष मयत)
८) अन्सारी दानिश म. अलिद (पु. वय १२ वर्ष मयत)
९) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी (पु. वय १८ वर्ष जखमी)
१०) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (पु. वय २२ वर्ष)
११) जुलैखा म. अली. शेख (स्री. वय ५२ वर्ष जखमी)
१२) उमेद जुबेर कुरेशी (पु. वय ४ वर्ष जखमी)
१३) सिराज अ. अहमद शेख (पु. वय २८ मयत)
१४) जुबेर कुरेशी (पु. ३० वर्ष मयत)
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |