पुसेगाव: विसापूर (ता.खटाव) येथील रामेश्वर डोंगराला लागलेल्या वणव्यामध्ये लाखो वृक्ष जळून खाक तर वन विभागाच्या कर्मचार्यांना आग विझवण्यास यश आले. रामेश्वर डोंगरांमधील विजारीचा नाळवा ते वाटी, बद्काल या ठिकाणी लागलेल्या आगीमध्ये जनावरांचा चारा गवत, लाखो वृक्ष, वनऔषधी व वेली जळून खाक झाली.
सध्या उन्हाळा तीव्र असल्यामुळे डोंगर भागात जनावरांना चारा आहे पण पाणी नसल्यामुळे जनावरे चारण्यासाठी कोणी डोंगरात जात नसल्याने याचा फायदा अज्ञात व्यक्तीने घेऊन डोंगराच्या पायथ्याला आग लावल्याने ही आग अंदाजे 60 ते 70 एकरात पसरल्याने गवताबरोबर हजारो वृक्षवेली, लहान मोठे जंगली औषधी झाडे-झुडपे जळून खाक झाली आहेत. रामेश्वर डोंगराला वनवा लागल्याची बातमी विसापूर येथील पोलीस पाटील श्री.सावंत यांना मिळताच वनरक्षक संभाजी दहिफळे यांना दूरध्वनीवरून सांगण्यात आले त्यांनी तात्काळ बबन जाधव व व्हनमाणे यांना घटनास्थळी बोलावून ब्लोअर मशीन व झाडांच्या डहाळ्याच्या साह्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीची तीव्रता व हवा जोरात असल्याने आग आटोक्यात येत नव्हती परंतु इलेक्ट्रिकल मशीन ब्लॉवर असल्यामुळे दिवसभर प्रयत्न केल्यानंतर आग विझविण्यार्या वन विभागाच्या कर्मचार्यांना यश आले.
या आगीमध्ये डोंगर भागातील अनेक मोठमोठे वृक्ष सागवान, निरगिली, ऑस्ट्रेलियन निरीगिली, शिसव, शिवरी यांसारखी अनेक मोठी झोड तर औषधी व फळ झाडे यामध्ये सुपारी, आवळा, धामणी,धैयवान, कुसंबी, वाघाटी, काळकुळं, टेंभुर्णी तर औषधी वनस्पतीमध्ये करडकान्गुनी, जांभळ, पाईर, आईन, धावडा, टंटणी, करवंद, शतावरी, भोकर, तर जंगली दोडका, कारलं, दूधधारा, साफकांदा आदी प्रकारच्या जंगली औषध असून काही मानवांना तर काही जनावरांना उपयोगी पडतात म्हणून या रामेश्वर डोंगराला जंगली औषधाचा डोंगर म्हणून ओळखले जाते. या डोंगरांमध्ये वन्य प्राणी ससा, रानडुकरे, तरस, लांडगा, कोल्हे, खवल्या मांजर, कलिंदर यांचा जास्त वावर आहे. पक्ष्यांमध्ये मोर, घार, धनेश, चिवळ, मैना तर सरपटणारे प्राणी घोरपड, फरुड विविध सरडे, अजगर, नाग, घोणस, मण्यार, धामणी विविध पट्ट्यांची गोम, विविध प्रकारचे विंचू आदी प्रकारचे पशुपक्षी या रामेश्वर डोंगरात आढळून येतात. अज्ञात व्यक्तींनी वनवा लावल्यामुळे वरील सर्व प्राण्यांचे जीव धोक्यात येतात व लाखो जीवजंतू जळून खाक होतात यासाठी रामेश्वर डोंगराच्या बाजूने असलेल्या गावांमधून विसापूर, जांब, जाखणगाव, बिटलेवाडी, रेवरकरवाडी, आवारवाडी, बुधावलेवाडी, मेगल दरवाडी, पांढरवाडी, खातगुण या गावांमधून वाडी वस्तीतून वनविभागामार्फत जनजागृती व निसर्गातील पशुपक्षी नवनवीन झाडांचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |