03:09pm | Oct 05, 2020 |
जम्मू : जम्मू काश्मीरच्या पंपोर बायपासवर दहशतवाद्यांनी खुलेआमपणे सीआरपीएफच्यारोड ओपनिंग पार्टीच्या जवानांवर खुलेआम गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाच जवानांपैंकी दोन जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. पंपोरमधील तंगनजवळ जम्मू - श्रीनगर हायवेवर हा हल्ला झाला. या हल्ल्यानंतर ताबडतोब सेनेनं या भागाला घेराव घालून सर्च ऑपरेशन सुरू केलंय.
कंडीजाल पुलानजिक लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी अचानक नाका पार्टीवर गोळीबार सुरू केला. परंतु, सावध असलेल्या जवानांनी हा हल्ला चुकवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पाच जवान गंभीररित्या जखमी झालेत.
हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. हल्ला करणार्या दहशतवाद्यांना आवर घालण्यासाठी ताबडतोब इतर सुरक्षा दलांना सूचित करण्यात आलं. सीआरपीएफच्या जखमी जवानांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु, दोन जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांवर घात लावून हा हल्ला करण्यात आल्याचं समजतंय.
दरम्यान, एका दिवसापूर्वीच जम्मू - काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात सेना आणि पोलिसांच्या संयुक्त टीमनं हत्यारांचा साठा जप्त केला होता. पोलीस आणि सेनेच्या संयुक्त टीमनं जिल्ह्यातील सूरन भागात तपासणी मोहीम सुरू केली होती. यामध्ये त्यांना हत्यारांचा मोठा साठा सापडला. जप्त करण्यात आलेल्या हत्यारांत मोठ्या दारुगोळ्यासहीत एके 47 रायफल्स, तीन मॅक्झीन आणि एका पिस्तुलाचाही समावेश होता. सुरक्षा दलाला दहशतवाद्यांच्या ठिकाणांबद्दल एक विशेष सूचना मिळाली होती. त्या आधारावर या भागात तपासणी मोहीम राबवण्यात आली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |