11:48am | Oct 19, 2020 |
सातारा : शहरातील मध्यवर्ती असलेल्या राधिका चौकातील कॅनरा बँकेच्या एटीएम मशीनमधून वेळोवेळी तब्बल 2 लाख रुपयांची रक्कम चोरी करणार्या टोळीचा शाहूपुरी पोलिसांनी छडा लावला. संशयित टोळी महाराष्ट्रासह तीन राज्यात वॉन्टेड असल्याची माहिती समोर आली आहे. शाहूपुरी पोलिसांनी हरियाणा राज्यात धडक मारुन संशयितांच्या मुसक्या आवळल्याने जिल्ह्यात शाहूपुरी पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सातार्यातील मध्यवस्तीत असणार्या राधिका चौकातील कॅनरा बँकेच्या एटीएममधून अज्ञात चोरट्यांनी वेळोवेळी पैसे चोरी केल्याचा गुन्हा शाहूपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. सपोनि विशाल वायकर यांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांना या चोरीचे धागेदोरे हाती लागत गेले. गुन्ह्याची व्याप्ती व त्यातील गांभीर्य मोठे असल्याने वायकर यांनी ही बाब पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व सहाय्यक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांना सांगितली. वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनीही वायकर यांना याबाबत कारवाई करण्याची पूर्ण मुभा दिली. शाहूपुरी पोलिसांनी याबाबत तपासाला सुरुवात केल्यानंतर त्यांना संशयितांची माहिती मिळाली. हे संशयित हरियाना राज्यात दबा धरुन बसले होते. परराज्यातून या आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी सातारा पोलिसांनी तयारी केल्यानंतर सपोनि संदीप शितोळे, पोलिस हवालदार स्वप्नील कुंभार, मोहन पवार, पंकज मोहिते हे रवाना झाले. पोलिस तपासाला गेल्यानंतर तेथे त्यांना अडचणी आल्या. मात्र, या अडचणींवर मात करत ते संशयितांपर्यंत पोहचले. संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांचे पथक सातार्याकडे रवाना झाले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याप्रमाणेच शहर पोलिस ठाण्यातही अशाचप्रकारचा एक गुन्हा 15 दिवसांपूर्वी दाखल झाला आहे. यामध्ये याच टोळीचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे आतापर्यंत नेमक्या किती राज्यात किती एटीएम चोरट्यांनी टार्गेट केली आहेत हे तपासाअंती समोर येणार आहे. दरम्यान, शनिवारी रात्री हे पोलिसांचे पथक शाहूपुरी पोलिस ठाण्यासमोर आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी तपास पथकाला हार घालून फटाके देखील फोडण्यात आले. संशयितांना न्यायालयात हजर करुन पुढील तपास सुरु केला जाणार आहेे.
शाहूपुरी पोलिसांनी संशयितांकडे प्राथमिक चौकशी केली असता संशयितांनी गुन्ह्यांच्या मालिकेचीच कबुली दिली. सातार्यासह कोल्हापूर, पुणे, मुंबई याशिवाय गुजरात व कर्नाटक राज्यातही या टोळीने धुडगूस घातला आहेे. एटीएम हेरुन हे चोरटे एटीएममधून तांत्रिक बाबी करुन टप्प्याटप्प्याने 5 ते 25 हजार रुपयांपर्यंत रक्कम काढत असत.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |