12:32pm | Dec 08, 2020 |
पुसेगाव: पीक उत्पादनामध्ये सहभागी असणार्या घटकांमध्ये जमीन हा अत्यंत महत्वाचा नैसर्गिक घटक असून, जमिनीचा कस उत्तम ठेवण्यासाठी मृदा व पाणी परीक्षणावर आधारित सुयोग्य व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. जमिनीची तपासणी करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे प्रतिपादन निढळ (ता.खटाव) येथील ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहामध्ये मार्गदर्शन करताना पंचायत समितीचे उपसभापती आनंदराव भोंडवे यांनी याप्रसंगी केले.
महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्यावतीने जागतिक मृदादिनाचे औचित्य साधून जमिनीची आरोग्यपत्रिका व मृदा तपासणी शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन यावेळी करण्यात आले. याप्रसंगी कृषि विभागाचे कृषि पर्यवेक्षक मुकुंद म्हेत्रे यांनी, कृषि तंत्रज्ञानामध्ये मृदा तपासणी करून अत्यंत महत्वाचे असून त्यानुसार तयार होणारे जमिनीची आरोग्यपत्रिकेनुसार खताचा वापर करणे आवश्यक असल्याचे सांगितले,
यावेळी श्री. म्हेत्रे यांनी मातीचा प्रातिनिधिक नमूना गोळा करणे, मातीचा नमुना घेण्याची पद्धत, व मातीचा गुणधर्माचा अभ्यास याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकर्यांना शेतावरती माती नमुने कसा घ्यावयाचा या विषयी कृषि सहाय्यक निलेश किरतकुडवे यांनी प्रात्यक्षिक करुन दाखवले. यावर्षी निढळ गावातील माती परिक्षण करुन आरोग्यपत्रिका वाटप केले जाणार आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करणेसाठी नवनाथ खुस्पे, शंकर दळवी, शिवाजी खुस्पे, सुनिल शिंदे, शंकर दळवी यांनी परिश्रम घेतले.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |