07:45pm | Oct 25, 2022 |
पुसेगाव : अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकं गेल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे,दिवाळीचा सण कसा करायचा हा यक्षप्रश्न आ वासून पुढे आहे, तर वाढत्या महागाईने नोकरवर्ग आर्थिकदृष्ट्या आधीच मेटाकुटीला आला आहे. त्यातच पेट्रोलपंपावर ग्राहकांना एक्स पी ९५ ऑकटेन हे अधिक दराचे पेट्रोल भरण्यासाठी सक्ती नाही मात्र नाहक अट्टाहास धरला जात आहे. खिशाला न परवडणारे पेट्रोल भराच म्हणून पेट्रोलपंपावर होणाऱ्या जाचाला ग्राहक वैतागले आहेत. त्यामुळे इंडियन ऑईलच्या पंपावर पेट्रोल भरला जायलाच नको अशी मानसिकता ग्राहकांच्यात होऊ लागली आहे. पर्यायाने या कंपनीच्या पेट्रोल डिझेल विक्रीत कमालीची घट होताना दिसत आहे. इंधन पुरवठा हा अत्यावश्यक सेवेत असल्याने जिल्हाप्रशासनाने याबाबत योग्य तोडगा काढून इंडियन ऑइल कंपनी च्या पेट्रोलपंपावर ग्राहकांना होणारा नाहक त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.
भारत पेट्रोलियम चे स्पीड, हिंदुस्थान पेट्रोलियम चे पॉवर तर इंडियन ऑइल कंपनी चे एक्स पी ९५ ऑकटेन ही नेहमीच्या पेट्रोल पेक्षा जादा दर असलेली पेट्रोल विक्री पंपावर होत असते. वास्तविक या पेट्रोलमुळे गाड्यांचे अव्हरेज चांगले मिळतेच, गाड्यांचे मेंटनन्स ही चांगले राहतात. पण ग्रामीण भागातील लोकांना, शेतकऱ्यांना एव्हरेज चे काही देणे घेणे नसते. ग्रामीण भागातील शेतकरी लोक शक्यतो जेमतेम म्हणजे ५०, १०० रुपये चे पेट्रोल दुचाकीत तर चारचाकी वाहनधारक पाचशे, हजार, दोन हजार रुपयांचे पेट्रोल आपल्या गरजेनुसार व कुवतीनुसार आपल्या गाडीत भरत असतात. तसेच शेतकरी वर्ग औषधे फवारणी पंपालाही किरकोळ स्वरूपात पेट्रोल नेत असतात.
इंडियन ऑइल कंपनी च्या पंपावरच एक्स पी 95 ऑकटेन पेट्रोल भरण्यासाठी ग्राहकांची इच्छा नसतानाही मनधरणी होताना दिसत आहे. अशी मनधरणी किंवा अट्टहास इतर कंपनीच्या पेट्रोलपंपावर होत नाही. नेहमीच्या पेट्रोलचा दर प्रति लिटर १०६ रुपये ९८ पैसे इतका आहे. मात्र कंपनी च्या फायद्यासाठी प्रति लिटर ११३ रुपये ९३ पैसे दराचे एक्स पी ९५ ऑकटेन पेट्रोलच भरा, म्हणून पेट्रोल पंपावरील कामगार ग्राहकांना सक्ती नाही. मात्र प्रचंड आग्रह, मनधरणी करत आहेत. त्यामुळे आपल्या खिशाला न परवडणारे पेट्रोल या कंपनीच्या पंपावर भरायला जायलाच नको, अशी मानसिकता ग्राहकांच्यात वाढू लागली आहे.
ग्रामीण भागातील ग्राहकाला आपल्या खिशाचा अंदाज असल्याने "नको ते एक्स पी, मला नेहमीच पेट्रोल टाका ! आधीच पैशाने जाम आहे. आणखी कुठं लिटरला सातआठ रुपये जास्त घालवू !" अशी चर्चा तर कधी कधी जादा दराचे पेट्रोल नको म्हणून वादाचे प्रसंग ही पेट्रोलपंपावर घडत आहेत. अधिक माहिती घेतल्यानंतर असे समजते की, इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील पेट्रोल पंप मालकांना नेहमीच्या पेट्रोल ऐवजी एक्स पी ९५ ऑकटेन हे सातआठ रुपये जादा दराचे पेट्रोल विक्री करणं बंधनकारक केले आहे.जर एक्स पी ९५ ऑकटेनचा सेल केला नाही तर नेहमीचे पेट्रोल ही त्या त्या पेट्रोलपंप मालकांना आवश्यकता असतानाही जाणीवपूर्वक मिळतच नाही.त्यामुळे एक्स पी व्यतिरिक्त नेहमीचे कमीदरातील पेट्रोल पंपावर उपलब्ध नसल्याने ग्राहक वैतागाने इतर ठिकाणी जाऊन पेट्रोल भरत आहेत. इंडियन ऑइल पंपावरचा विक्री दर ही मंदावला असल्याचे दिसत आहे. तरी इंधन पुरवठा हा अत्यावश्यक सेवेत असल्याने प्रशासनाने याबाबत योग्य तोडगा काढून पेट्रोलपंपावर ग्राहकांना इच्छा नसताना होणारा नाहक त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |