पोलादपूर : पोलादपूर शहरात पहाटेच्या सुमारास दोन शाळकरी मुले संशयास्पदरित्या फिरताना आढळली त्यानंतर त्यांची आस्थापूर्वक माहिती घेता दोघेही महाबळेश्वर येथील एका हायस्कूलच्या कॅम्पसमधून निसटले असल्याचे आढळून आले. मात्र, पोलादपूर पोलीसांनी गस्तीदरम्यान आढलेली ही दोन्ही मुलं पुन्हा कॅम्पसमधून अधिक्षकांच्या ताब्यात देऊन कर्तव्य बजावले.
पोलादपूर ते महाबळेश्वर मार्गावर सोमवारी पहाटे गाडीतळ ते बँक ऑफ इंडिया कॉर्नर या रस्त्यावर पहाटेच्या सुमारास दोन शाळकरी मुले पायी चालत फिरताना दिसून आली. या मुलांसोबत कोणीही पालक नसल्याने पोलीसांचे गस्ती पथक पाहून त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने पोलादपूर बिट मार्शल यांनी त्यांना सहज आस्थापूर्वक चौकशी करीत त्यांची नांवे विचारून कोठून आल्याचे विचारले असता हे दोघे विद्यार्थी महाबळेश्वर येथील अंजूमन ऊर्दू हायस्कूल कॅम्पसमधून अज्ञात वाहनाने कोणासही कोणतीही पूर्व कल्पना न देता निसटले असल्याचे समजून आले.
पोलीस हेडकॅस्टेबल व्ही.जी.चव्हाण यांनी दोघांना पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये आणून चौकशी केली असता यापैकी एकाचे नांव अब्दुल महामूद शेख तर दुसर्याचे नांव रहमतल्ला शेख आणि दोघांची वये सात वर्षे असल्याची माहिती प्राप्त झाली. यानंतर हेडकॉन्स्टेबल चव्हाण यांनी त्यांच्या हायस्कलच्या प्राचार्यांना या मुलांची माहिती दिली आणि पोलादपूर येथे बोलावून घेतले.
सोमवारी सुमारे पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथील अंजूमन ऊर्दू हायस्कूल कॅम्पसचे अधिक्षक इम्रान इकबाल अहमद शेख यांनी पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये आले. पोलादपूर पोलीस ठाण्यातून दोन्ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन ते पुन्हा कॅम्पसमध्ये रवाना झाले. पोलादपूर पोलीसांच्या तत्परतेमुळे या दोन लहानग्या मुलांच्या पुढील आयुष्यातील धोक्याची शक्यता टळल्याबद्दल बिट मार्शल व हेडकॉंस्टेबल चव्हाण यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |