08:08pm | Jan 21, 2021 |
सातारा : सातारा जिल्हा न्यायालयात वाई हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान आज (दि.21) सुनावणी सुरू असताना यातील माफीची साक्षीदार असलेली ज्योती मांढरे हिला अचानक चक्कर आल्याने न्यायालयाचे कामकाज 10 मिनिटे थांबवावे लागले. यानंतर पुन्हा सुनावणी सुरू झाली. याबाबत उद्याही (दि. 22) सुनावणी होणार आहे.
डॉक्टर नसलेल्या संतोष पोळ याने वाई शहरासह परिसरातील अनेकांचे खून केले. खून केल्यानंतर त्याने धोम धरणालगत असलेल्या फार्म हाऊसमध्ये सहा मृतदेह पुरून ठेवले. शेवटचा खून मंगल जेधे या महिलेचा केल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) या प्रकरणातील ज्योती मांढरे व त्यानंतर संतोष पोळ यांना अटक केली. ज्योती मांढरे माफीची साक्षीदार झाली व तिने डॉ. पोळ याने कशा पद्धतीने हत्याकांड केले याचा पाढा न्यायालयात वाचला.
सातारा जिल्हा न्यायालयात सध्या संतोष पोळ खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम हे काम पाहत आहेत. दरम्यान, न्यायालयात ज्योती मांढरे हिची साक्ष आणि उलट तपासणी सुरु असताना तिला अचानक चक्कर आली. ज्योती मांढरेला पाणी देऊन न्यायालयाने 10 मिनिटांचा ब्रेक घेत ज्योतीने पुन्हा ठीक असल्याचे सांगितल्यानंतर कोर्ट कामकाजाला सुरुवात झाली. याबाबतची पुढील सुनावणी उद्याही सुरु राहणार असल्याचे ऍड. उज्ज्वल निकम यांनी सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |