10:44pm | Jul 08, 2020 |
सातारा : देऊर ता.कोरेगाव येथे महावितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या साहिल विजय खरात (वय -२१) या प्रशिक्षणार्थी वायरमनचा वीज खांबावर दुरुस्ती करताना विजेचा शॉक व पोलवरुन खाली पडल्याने जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. या घटनेला कारणीभूत असणाऱ्या संबधित महावितरणच्या तीन जणांनवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत वाठार स्टेशन पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत प्रशिक्षणार्थी वायरमन साहिल खरात हा मूळ गांव ल्हासुर्णे ता.इंदापुर जि.पुणे येथील आहे. महावीजवितरण कंपनीच्या वाठार स्टेशन विभागातील देऊर शाखेत गेल्या सहा महिन्यापासुन प्रशिक्षणार्थी वायरमन म्हणून काम करीत होता. सध्या तो सातारारोड येथील गणेश माने याठिकाणी मामाच्याकडे राहत होता. मंगळवार दि.८ रोजी सायंकाळी पाच वाजता देऊर हद्दीतील अचानक लाईट गेल्याने वीज वितरण कंपनीचे वायरमन रमेश हुसेन भडकवाडआणि प्रशिक्षणार्थी वायरमन साहिल खरात, संदेश पवार हे तिघेजण दुरुस्तीच्या ठिकाणी गेले होते. संदेश पवार लाईट बंद करण्यासाठी गेला तर वीज दुरूस्तीसाठी साहिल खरात विजेच्या खांबावर चढला, मात्र विजेचा शॉक लागल्याने तो खांबावरुन पडून गंभीररित्या जखमी झाला. त्याच्या हाताला व शरीराला भाजलेल्या जखमा होत्या. त्याला उपचारासाठी पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तत्पुर्वी त्याचा विजेच्या धक्क्यासह पोलवरुन खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला होता.
या घटनेने साहिल खरात याच्या नातेवाईकानी घटनास्थळी व पोलीस स्टेशनला धाव घेतली. स्वतः वायरमन गणेश भडकवाड असताना सुध्दा साहिल खरात या प्रशिक्षणार्थी कर्मचारी वायरमनला विजेच्या खांबावर कसे चढून दिले?तसेच खांबावर विद्युत वाहक बंद करण्याचा परवाना न घेता व लाईट बंद न करता प्रशिक्षीत वायरमनला वीज पोलवर चढवल्याने खरात याचा मृत्यु झाला असल्याची व याला संबधित अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याची तक्रार साहिल खरात याचे चुलते भाऊसाहेब खरात यांनी दिली आहे.
वायरमन गणेश भडकवाड वाठार स्टेशनचे वरिष्ठ अभियंता उत्तम जगन्नाथ मंचरे, शाखा अभियंता सागर प्रकाश पवार या तिघांविरुध्द तक्रार दिली आहे. तिघां विरुध्द ३०४ कलम अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, काल रात्री आठ वाजता साहिल याचे पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेन करण्यात आले असून, आज दुपारी सुमारास साहिलच्या नातेवाईकांनी साहिलच्या मृत्युस जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेचा पुढील तपास वाठार स्टेशनचे सपोनि. स्वप्नील घोंगडे करीत आहेत.
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |
अजित वाकनीस यांचे निधन |