12:46pm | Oct 21, 2020 |
जळगाव: भाजपा नेते एकनाथ खडसे भाजपात राहणार की राष्ट्रवादीत जाणार यावर सध्या महाराष्ट्रात तर्कविर्तकांना उधान आले आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका करणारे जयंत पाटील यांचे ट्विट एकनाथ खडसे यांनी रिट्विट केले खरे परंतु काही वेळातच पुन्हा ते डिलिट केले. यामुळे एकनाथ खडसे नेमकी कोणती भूमिका घेणार याबाबत सस्पेंस अजून वाढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल देशाला संबोधल्यानंतर जयंत पाटील यांनी ट्विट करत पंतप्रधानांवर टिका केली. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की ’आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील. कोरोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना दिलासा देतील असे वाटले होते. मात्र, यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला’. अशी टीका जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटद्वारे नरेंद्र मोदी यांच्यावर केली होती.
विशेष म्हणजे, भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी जयंत पाटील यांचे ट्वीट रीट्वीट केले. त्यामुळे एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश लवकरच होईल, असा अंदाज बांधला जात आहे. खडसेंनी आतापर्यंत कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका-टिप्पणी किंवा नाराजी व्यक्त केलेली नव्हती. परंतु, त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू असतानाच त्यांनी प्रथमच थेट नरेंद्र मोदींवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याने चर्चा रंगली आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |