10:25pm | Nov 21, 2020 |
सातारा : जिल्ह्यात शनिवारी 8 बाधितांचा मृत्यू, तर 166 बाधितांची नोंद झाली. तसेच 232 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला असून 349 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढतोय तसेच मृत्यूदरामध्येही वाढ होताना दिसत असताना नागरिकांनी सावध होण्याची गरज सातारा जिल्ह्यात निर्माण होत आहे. शनिवारी जिल्ह्यात 8 बाधितांच्या मृत्यूने कोरोनाबळींची संख्या 1 हजार 678 वर पोहोचली आहे. तसेच 166 बाधित निष्पन्न झाल्याने एकूण बाधितांची संख्या 49 हजार 732 वर पोहोचली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील विविध रुग्णालये, कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 232 नागरिकांना घरी सोडण्यात आल्याने जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 47 हजारांचा पल्ला पार करीत 47 हजार 53 वर पोहोचला असून 349 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याचीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
8 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये चिंचणेर ता. सातारा येथील 76 वर्षीय पुरुष, मलवडे ता. माण येथील 80 वर्षीय महिला, कासारशिरंबे ता. कराड येथील 52 वर्षीय पुरुष, उडतारे ता. वाई येथील 65 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटमध्ये संभाजीनगर ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, ताडदेव मुंबई येथील 78 वर्षीय परुष, पुसेगांव ता. खटाव येथील 75 वर्षीय पुरुष तसेच रात्री उशीरा कळविलेले कराड येथील 58 वर्षीय पुरुष अशा एकूण 8 कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
349 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, कराड येथील 11, फलटण येथील 14, कोरेगांव येथील 35, वाई येथील 40, खंडाळा येथील 77, रायगांव येथील 4, पानमळेवाडी येथील 17, महाबळेश्वर येथील 10, दहिवडी येथील 11, खावली येथील 3, म्हसवड येथील 17, पिंपोडा येथील 12, तरडगांव येथील 16 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 71 असे एकूण 349 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |