शिरवळ : पुणे -बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा गावच्या हद्दीमध्ये बाळूमामाच्या मेंढरांचे दर्शन घेऊन परतणा-या भाविकांच्या कारने महामार्गालगत अवैधरित्या थांबलेल्या मालट्रकला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेत महिलेसह दहा वर्षाचा मुलगा जागीच ठार झाला असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. एक मार्च रोजी राञी साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला आहे.
याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, पुणे जिल्ह्यातील वडगाव रासाई, ता.शिरुर येथील वनशिवे, कुलते कुंटूंबिय नातेवाईकांसमवेत सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या बाळूमामाच्या दर्शनासाठी कार (क्रं.एमएच-13-एन-3154) मधून गेले होते. यावेळी दर्शन घेऊन परत घरी पुणे बाजूकडे परतत असताना कार खंडाळा येथील एका हॉटेलसमोर भरधाव वेगाने आली असता कारने महामार्गालगत अवैधरित्या थांबलेल्या मालट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. कारमध्ये बसलेल्या कांचन चंद्रकांत वनशिवे (वय30, वडगाव रासाई ता.शिरुर जि.पुणे), विरेंद्र चंद्रकांत वनशिवे (वय 10) हे दोघे जागीच ठार झाले, तर कारमधील संकेत भिमाजी चौधरी (वय 22, रा.वडगाव रासाई ता.शिरुर जि.पुणे), स्नेहल पांडुरंग कुलते (वय 42, रा.अकोला), अनिल मुक्ताराम कुलते (वय 55, रा. अकोला), अंजली अनिल कुलते (वय 50, रा. अकोला), परी अनिल कुलते (वय 7) हे पाचजण गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच तत्काळ खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कारचा चक्काचूर झाल्याने जागीच ठार झालेल्या कांचन वनशिवे व विरेंद्र वनशिवे यांचे मृतदेह काढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. क्रेनच्या साहाय्याने कारचा भाग बाजूला करत घटनास्थळी उपस्थित नागरिकांच्या मदतीने मृतदेह काढण्यात खंडाळा पोलीसांना यश आले. यावेळी गंभीर जखमी झालेल्या भाविकांना खंडाळा येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरु आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |