सातारा : सातारा जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात ट्रक विकत घ्यायचे सोंग करुन थोडे पैसे देवून ट्रक ताब्यात घेतल्यानंतर त्याचे पूर्ण पैसे न देता ठगवल्याप्रकरणी आझीम सलीम पठाण (रा.रहिमतपूर ता.कोरेगाव) याला सातारा तालुका पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने (डीबी) अटक केली. दरम्यान, संशयिताने अनेकांना गंडवले असल्याची शक्यता असून याबाबत पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहेे.
परमेश्वर जयसिंग सानप (रा.शेंद्रे ता.सातारा) यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहेे. याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार यांचा संशयितासोबत ट्रकमधून व्यवहार झाला होता. मात्र संशयिताने व्यवहार पूर्ण न करता तक्रारदार यांची फसवणूक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस संशयिताचा शोध घेत असताना त्याला थरारकपणे पकडले. संशयिताकडे पोलिस तपास करत असताना तो बधत नव्हता. अखेर पोलिसांनी कौशल्याने तपास करत प्रश्नांची सरबत्ती त्याच्यावर केल्यानंतर तो पोपटासारखा बोलू लागला.
संशयित हा ट्रक मालकांना भेटून त्यांना बोलण्यात गुंतवून भुरळ पाडत होता. व्यवहार ठरल्यानंतर संशयित लगेच थोडी रक्कम द्यायचा व ट्रक ताब्यात घ्यायचा. त्यानंतर मात्र संशयित व्यवहार करणार्यांना टाळायचा. अशातूनही त्याला कोणी गाठले तर त्याने तोपर्यंत विकत घेतलेल्या ट्रकचे रुपडे पालटले असायचे. यामुळे मूळ मालकाला देखील त्याचा ट्रक ओळखने अडचणीचे व्हायचे. तक्रार देण्याची कोणी भाषा केली तर संशयित हा ट्रकची विल्हेवाट लावण्याची धमकी देत होता. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता इचलकरंजी येथे संशयितावर गुन्हा दाखल झालेला आहेे. पोनि सजन हंकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दादा परिहार, सुजित भोसले, हेमंत ननावरे, सागर निकम, सतीश पवार, नितीराज थोरात, निलेश जाधव, उदयसिंह पावरा यांनी कारवाईत सहभाग घेतला.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |