11:41pm | Oct 23, 2020 |
कराड : महा एनजीओ फेडरेशनच्यावतीने सातारा जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या समन्वय बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमी स्वंयसेवी संस्थांच्या कार्याच्या आढाव्यासह सामाजिक संस्थांपुढील समस्या आणि स्वंयसेवी संस्थांच्या सक्षमीकरणाविषयी चर्चा झाली. यावेळी महा एनजीओ फेडरेशन राज्यातील सामाजिक संस्थांना बरोबर घेवून आत्मनिर्भर दिवाळी उपक्रम राबविणार असल्याचे फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी सांगितले.
महा एनजीओ फेडरेशनच्यावतीने सातारा जिल्ह्यातील सामाजिक संस्थांशी संवाद साधण्यात आला. यावेळी फेडरेशनचे संचालक गणेश बाकले, ह.भ.प.अक्षय महाराज भोसले, जिल्हा समन्वयक आनंदा थोरात यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, फलटण तालुक्यातील सामाजिक संस्थांच्या विविध उपक्रमांची माहिती घेवून संस्थांच्या वाटचालीचे महा एनजीओ फेडरेशनच्यावतीने कौतुक करण्यात आले.
यावेळी कोरोना जन्य परिस्थितीत जिल्ह्यातील संस्थांनी केलेल्या सेवा कार्याचा आढावा घेण्यात आला. अनेक संस्थांनी राबविलेल्या नाविण्यपुर्ण
उपक्रमांची माहिती दिली. त्याचबरोबर महा एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातूनही राज्यात गरजूंना मदत पोहचविण्याबरोबरच मास्क वितरण आणि आरोग्यविषयीक सेवा सुविधा उपलब्ध करण्यात आल्याचे संस्थापक शेखर मुंदडा यांनी सांगितले.
त्याचबरोबर सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. आत्मनिर्भर ग्राम अभियान अंतर्गत पुढील वाटचालीविषयी संचालक अक्षय महाराज भोसले यांनी माहिती दिली. तर संचालक गणेश बाकले यांनी सेवा सप्ताह कार्य आढावाचा घेत बीव्हीजी कंपनीसबोत कृषीपूरक उद्योजकता संधीविषयी मार्गदर्शन केले. जिल्हा समन्वयक आनंदा थोरात यांनी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांच्या सेवा कार्याच्या माहिती दिली.
यावेळी अनेक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वंयसेवी संस्थांच्यापुढील समस्या मांडत शासनाच्या काही योजना आणि प्रकल्पात काम करण्यास इच्छूक
संस्थांना जाचक अटीमुळे सहभागी होता येत नसल्याची नाराजी व्यक्त केली. कोणत्याही संकटात सामाजासाठी कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना अधिक संधी शासकीय प्रकल्पामध्ये मिळण्यासाठी संघटीत प्रयत्न करण्याची गरज अनेकांनी व्यक्त केली. सामाजिक संस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक तो लढा महा एनजीओ फेडरेशन उभा करेल, असे शेखर मुंदडा यांनी सांगितले.
यावेळी प्रताप गोरे, निलिमा कदम, मनोज विधाते, अलका पाटील, संध्या इंगळे, पौर्णिमा साळुंखे, सचिन कांबळे, सुजाता कदम यांनी आपली मते मांडली.
प्रल्हाद पारटे यांनी स्वागत केले. अनिल वसव यांनी आभार मानले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |