01:26pm | Aug 28, 2022 |
फलटण : फलटण शहर पोलीस स्टेशन चे डी. बी.पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे व पोलीस उपनिरिक्षक ए. ए. कदम यांनी धडाकेबाज कारवाई करत फलटण शहराच्या हद्दी मध्ये जुगार व मटका सुरु असणार्या दोन अड्ड्यांवर कारवाई केली. या दोन्ही कारवायांमध्ये मोटर सायकल सह सुमारे 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.27 ऑगस्ट रोजी सांयकाळी 17.45 गडसोली मैदान येथे गाळा नंबर 130 मध्ये 1) अजय कांतीलाल काकडे वय 27 वर्षे रा मंगळवार पेठ फलटण ता फलटण 2) पिटु बापु आडके वय 34 वर्षे रा. वडले, ता. फलटण जि. सातारा 3) जयदिप संपत काकडे वय 40, रा. मंगळवार पेठ फलटण, ता. फलटण यांनी मोबाईल मधील ऍप संगणकास जोडून ऑनलाईन ऍपव्दारे जुगार घेत खेळत असताना त्यांच्या ताब्यातील जुगाराचे सहित्य व रोख रक्कम 6760/- व दोन मोबाईल 15000/- रूपये असे, मोटार 2,00,000/- रूपये किंमतीच्या, व जुगाराचे खेळावयाचे साहित्य एकूण 59410/- रू किंमतीचे असा एकूण 2 लाख 81 हजार 170 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला.
फलटणमध्येच झालेल्या दुसर्या कारवाई मध्ये त्याच दिवशी सायंकाळी 17.45 वाजता गडसोली मैदान येथे गाळा नंबर 57 मध्ये 1)सतपाल बापट अहिवळे 2) सुहास तानाजी पोंदुकले वय 25 वर्षे राहणार सांगवी, ता. फलटण जि. सातारा 3) विशाल अशोक पवार वय 34 वर्षे, राहणार सोमवार पेठ, फलटण, तालुका फलटण 4) प्रमोद अरविंद खरात वय 29 वर्षे, राहणार सोमवार पेठ फलटण 5) मुन्ना मेहबूब शेख वय 49 वर्षे, रा.सांगवी, तालुका फलटण यांनी मोबाईल मधील ऍप संगणकास जोडून ऑनलाईन ऍपद्वारे जुगार खेळत असताना त्यांच्या ताब्यातील जुगाराचे साहित्य व रोख रक्कम 4960/- व दोन मोबाईल 30000/- रुपये असे, मोपेड मोटरसामकल 45000/ - रुपये किमतीची , पोर्टेबल प्रिंटर 7000/- डेल कंपनीचा सीपीयू 15000/- रुपये, काळ्या रंगाचा मॉनिटर 5000/-, कीबोर्ड 500/-रुपये ,माऊस 300/- रुपये ,प्लास्टिक खुर्च्या 1200 /- रुपये किमतीचे असे एकूण 1 लाख 8 हजार 970 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह मिळून आला. म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायदा चार-पाच प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक बी.एस.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी.चे पोलीस उपनिरीक्षक सुरज शिंदे, पोलीस उपनिरीक्षक ए. ए. कदम यांच्यासह दिग्विजय सांडगे, सुजित गावडे, अच्युत जगताप, शरद तांबे, राकेश घोरपडे, सुरज परिहार, सुनील यादव, सतीश दडस, विक्रम बनकर यांनी केली.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |