11:05am | Oct 17, 2020 |
नवी दिल्ली : भारताने आता आपल्या कोविड-१९च्या (Covid-19) क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉलचा (Clinical Management Protocol) आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोविड-१९ च्या उपचारासाठी वापरण्यात येणारी चार औषधे प्रभावी नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या संशोधनात सिद्ध झाले आहे. रेमडेसिवीर, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन, लोपिनॅविर आणि इंटरफेरॉन ही औषधे कोविड-१९ वर फारशी उपयोगाची नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
रेमडेसिवीर या औषधचा भारतासह जगभरात सुरू असलेला प्रयोग मात्र सध्या सुरूच ठेवण्यात येणार आहे. जो पर्यंत ड्रग रेग्युलेटरी अथॉरिटीकडून सूचना मिळत नाहीत, तो पर्यंत रेमडेसिवीरचा वापर सुरूच राहील, असे ICMR-नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टीट्यूटचे संचालक समीरण पांडा यांनी म्हटले आहे.
नॅशनल टास्क फोर्स आणि जॉइंट मॉनिटरिंग ग्रुपशी चर्चा केल्यानंतर समीक्षा केली जाईल, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे (ICMR) संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी म्हटले आहे. आम्ही आमच्या क्लिनिकल प्रोटोकॉलचा आढावा घेऊ आणि त्यात आवश्यक ते बदल करू, असे आणखी एका अधिकाऱ्याने म्हटले आहे. आम्हाला पुढे रेमडेसिवीरचा उपयोग करायचा आहे की नाही, हे ठरविण्यासाठी संशोधन आवश्यक आहे. आम्ही सॉलिडॅरिटी ट्रायलच्या पुराव्यांती समीक्षा करत आहोत, असेही अधिकारी म्हणाला.
सध्या का सुरू ठेवावी ट्रायल?
या औषधाचा परिणाम होत नसल्याचे अंतरिम परिणामावरून स्पष्ट होत आहे, मात्र रेमडेसिवीरचा एखाद्या सब-ग्रुपला फायदा होतोय की नाही हे पाहण्यासाठी ट्रायल मात्र सुरूच ठेवली जाईल असे ट्रायलच्या स्टीयरिंग कमिटीचे के. श्रीनाथ रेड्डी यांनी म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात या औषधाचा किती परिणाम होतो यासाठी हजारो लोकांची तपासणी करण्यात आली होती. जागतिक आरोग्य संघटनेने सहा महिने हा अभ्यास केला. रेमडेसिवीर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन, लोपिनॅवीर आणि इंटरफेरॉन या औषधांचा कोविड-१९च्या रुग्णांवर अतिशय कमी परिमाम जाणवला किंवा अजिबातच परिणाम जाणवला नसल्याचे या अभ्यासात आढळून आले.
छत्रपती शिवाजी कॉलेजची एन सी सी कॅडेट गार्गी थल सैनिक कँपसाठी दिल्लीला रवाना |
भा ज पा सातारा जिल्हा कोअर कमिटी आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न |
साताऱ्यासह पश्चिम भागात पाऊस |
आरक्षण मिळेल, पण अगोदर नोकर्या वाचवा! |
कोंडवे येथील एका शाळकरी मुलाची आत्महत्या |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
जनता सहकारी बँकेच्या सेवक संचालकपदीच्या निवडी बिनविरोध |
जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचे यश |
जिहे विकास सेवा सोसायटीचे कार्य उल्लेखनीय |
आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
टेरेसवरून पडून महिलेचा मृत्यू |
बेदरकारपणे दुचाकी चालवल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
सोनगावातून सुमारे तीन लाखांच्या ट्रान्सफॉर्मर ची चोरी |
जबरी चोरी प्रकरणी दोघांवर गुन्हा |
दोन घटनांमध्ये दोन महिला बेपत्ता |
एमडीआरटी सल्लागारांच्या क्रमवारीत टाटा एआयए जगात पाचव्या तर भारतात पहिल्या स्थानी |
महालक्ष्मीच्या आरतीसाठी सोळा दिवे आणि 56 भोग |
बेडग ते मंत्रालय लॉंग मार्च आंदोलकांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी साताऱ्यात मान्यवरांची भेट |
व्यवहारातील संवेदना समजावणारे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळायला हवे |
बेडग येथील कमान प्रकरणाचा रिपाईद्वारे साखळी मोर्चा काढून निषेध |