बुध: गेली सतत तीन वर्षे विरोधात बातम्या, भाषणे, निवेदन देऊनही आ.शशिकांत शिंदे यांनी राजकारनातील टीका, टिप्पणी बाजूला ठेवून माझ्या तब्बेतीची प्रथम चौकशी करून नंतर वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या. आ. शिंदे हे दिलदार संयमी नेतृत्व आहेत, असे प्रतिपादन जिल्हा भारतीय पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी केले. रमेश उबाळे यांनी माजी जलसंपदा मंत्री आ.शशिकांत शिंदे यांना सातारा विश्राम गृहावर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते बोलत होते.
रमेश उबाळे म्हणाले, विधानसभा निवडणूकीपूर्वीपासून आम्ही आ.शिंदे यांचेविरोधात सोशल मिडिया, वर्तमान पात्रात बातम्या प्रसिद्ध केल्या. त्यांच्या विरोधात भाषणबाजी केली. निवेदने दिली गेल्या तीन वर्षांपासून आपण करत आहोत. मला तर वाटले आ.शिंदे माझ्या शुभेच्छा स्वीकारतील की नाही मला शुभेच्छा देण्यापूर्वी माझ्या मनात शंका कुशंका होत्या. परंतु आ.शिंदे यांनी मला पाहिल्यानंतर आरे तुमची तब्बेत इतकी बारीक कशी झाली? असा प्रश्न करत माझ्या तब्बेतीची विचारपूस केली नंतर माझ्या शुभेच्छांचा मोठ्या मनाने स्वीकार केला. खरोखर इतकी टीका, टिप्पणी करूनही आपल्या शुभेच्छांचा स्वीकार केला. यानंतर मला मनोमन पटले की आ.शिंदे हे राजकारण, समाजकारणातले दिलदार, संयमी नेते आहेत. नेता असावा तर आ. शशिकांत शिंदेसारखा. अशी मला यावेळी जाणीव झाली असेही ते यावेळी म्हणाले.
त्यांनी मला प्रथम तब्बेतीची चौकशी केल्यानंतर मी एक एक पाऊल पुढे टाकत शाल, पुष्पहार घालून आ.शिंदे यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांचा संयम, मनाचा दिलदारपणा मला प्रथमच अनुभवता आला मला त्यांना भेटून खूप आनंद झाला आहे. आम्ही राजकारणात विरोधक असलो तरी आम्ही गाववाले आहोत. आ.शिंदे यांना दीर्घ आयुष्य मिळून अधिक- अधिक लोकसेवा करण्याची संधी मिळावी, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना आहे, असेही उबाळे बोलताना यावेळी म्हणाले.
जरा वेळ काढा निवांत गप्पा मारू
या आठवड्यात मी ल्हासुरणेंला येणार आहे.तुम्हीही वेळ काढा आपण निवांत बसून गप्पा मारू या. असेही आ.शिंदे यावेळी म्हणल्याचे उबाळे यावेळी म्हणाले.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |