12:17pm | Oct 04, 2021 |
पाटण : पाटण तालुक्यातील दुर्गम डोंगराळ अशी ओळख असलेल्या कोयना विभागातील डोणीचावाडा गावचा सुपूत्र प्रशांत यमकर या ध्येवादी तरूणाने क्रिडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर गगन भरारी घेतली. पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यासाठी ही मोठी अभिमानाची बाब आहे.
प्रशांत यमकर यांची भारतीय राष्ट्रीय क्रिडा प्रधिकराणामध्ये अॅथलिट मॅनेजर पदी निवड झाली आहे.
सन २०२४ ला राष्ट्रीय पातळीवरती होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेसाठी नवीन खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची संधी पाटण तलुक्यातील प्रशांत यमकर यास भेटणार आहे. हि निश्चितच पाटण तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सातारा जिल्ह्याच्या पाटण तालुक्यातील कोयना विभागीतील वांझोळे ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या डोणीचावाडा या गावातील युवक प्रशांत यमकर यास शालेय शिक्षणापासून बास्केटबॉल खेळाची आवड निर्मण झाली. वडील बयाजी यमकर भारतीय सैन्यात अधिकारी होते. ते सेवानिवृत्त आहेत तर, आई गृहिणी आहे.
अताच्या युवकांसाठी प्रशांत खरच एक आदर्श आहे. बास्केबॉट सारख्या वेदेशी खेळात करियर करणे ही काय साधी गोष्ट नाही. पण त्यात राष्ट्रीय पातळीवरती खेळून त्यात दैदिप्यमान यश मिळवले आहे. अपार मोहनत आणि प्रचंड चिकाटी असलेल्या प्रशांत यमकर याने एमबीए सुध्दा क्रिडा व्यावस्थापन केले आहे. पुणे डेक्कन जिमखाना संघाचे तो प्रतिनिधित्व करत आहे.
पटियाला येथे प्रशांत याने प्रमाणित प्रशिक्षकचे ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केले. महाराष्ट्र राज्यातून प्रशांत याच्यासह चार जणांची निवड करण्यात आली. त्याची कोलकता येथे नियुक्ती झाली आहे. नुकतीच साताऱ्याचे खा. छ. उदयराजे भोसले ह्यानी स्वता: इस्टग्रामवर पोस्ट करून प्रशांत यांचे अभिनंदन केले आहे.
प्रशांत याने प्रशिक्षण केलेले खेळाडूजेव्हा पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील तेंव्हा खरच आपल उर भरून येईल. पाटण तालुक्यातील छोट्याशा गावातील प्रशांत याने अपर मेहनत, जिद्द बाळगून जे राष्ट्रीय पातळीवर जे यश मिळवले आहे. त्यामुळे पाटण तालुक्याच्या शिरोपेचात मानाचा तुरा खोवला आहे. प्रशांत खामकार यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |