सातारा: येथील तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात आज सकाळी दोघांमध्ये धारदार शस्त्राने जोरदार हाणामारी झाली. कोयत्याचा वार वर्मी बसल्याने एकजण उपचार सुरू असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू पावला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पोलीस ठाण्याच्या आवारात खून झाल्याने सातारा शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश प्रल्हाद कांबळे (वय 44, रा.सैदापूर) तर रामा दुबळे (रा.मतकर कॉलनी) यांच्यामध्ये मुलीशी बोलण्यावरून वाद झाला होता. त्या वादाचे पर्यवसान हाणामारीतही झाले होते. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार त्या दोघांनाही आज तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात बोलावून घेतले होते. त्यानुसार सुरेश कांबळे हा आधीच पोलीस ठाण्यात आला होता. थोड्या वेळाने रामा दुबळेही पोलीस ठाण्यात आला. दोघे समोर येताच जुन्या भांडणामुळे दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी सुरेश कांबळे याने सोबत लपवून आणलेल्या कोयत्याने रामा दुबळेवर हल्ला चढविला. या हल्ल्यात रामा जखमी झाला. यानंतर खाली पडलेल्या कोयत्याने रामा दुबळेने सुरेश कांबळेवर जोरदार हल्ला चढवत सपासप वार करण्यास सुरूवात केली. या हल्ल्यात सुरेश कांबळेच्या डोक्यात तसेच हातावर सपासप वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. एक मिनीटाच्या आत घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण तालुका पोलीस ठाणे हादरून गेले. यावेळी भांडणे सोडविणारा एक पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाला आहे. उपस्थित पोलिसांनी दोघांनाही तात्काळ ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अतिरक्तस्त्राव व खोल जखमांमुळे सुरेश कांबळेचा जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर संशयित रामा दुबळे याच्यावर उपचार सुरू आहेत.
सातारा पोलीस ठाण्याच्या आवारातच घडलेल्या या घटनेमुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून परिस्थिती आटोक्यात आणली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत संबंधित अधिकार्यांना तपासाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |