09:32pm | May 23, 2023 |
सातारा : आगामी लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने माढा मतदारसंघासाठी ऍक्शन प्लॅन तयार केला असून काही दिवसांतच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौर्यावर येत आहेत. उपमुख्यमंत्र्यांच्या या दौर्यामुळे मतदारसंघातील मतदारांसह कार्यकर्ते-पदाधिकार्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी प्रतिनिधित्व केलेल्या मतदार संघामधून गत लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर बहुमताने निवडून आलेले आहेत. आगामी काळामध्ये माढा लोकसभा मतदार संघामधून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार विजयी होण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे केंद्र सरकारमधील व राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्र्यांनी लक्ष घातलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या काही दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस हे फलटणसह माण तालुक्याच्या दौर्यावर येत आहेत.
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सातारा जिल्ह्यामधील दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामध्ये फलटण, कोरेगाव विधानसभा मतदारसंघ व माण-खटाव विधानसभा मतदारसंघ असे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. यामधील फलटणला राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तर माण विधानसभेवर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे हे प्रतिनिधित्व करीत आहेत. आगामी काळात लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोणकोणत्या ठोस भूमिका घ्याव्या लागतील यासाठी आता भारतीय जनता पार्टी कामाला लागलेली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी गेल्या लोकसभेवर निवडून गेल्यापासून माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये हजारो नव्हे तर लाखो कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणलेला आहे. ज्या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद सैल होती, त्याच माढा मतदारसंघांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भारतीय जनता पार्टीची पकड आता घट्ट केलेली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |