बारामती : बारामतीचा शहरातील अभिषेक सतीश ननवरे या युवकाने दक्षिण आफ्रिका येथे शनिवारी पार पडलेली आयर्नमॅन स्पर्धा १३ तास ३३ मिनिटांत पूर्ण करत नव्या विक्रमाची नोंद केली आहे.
भारतातून सर्वाधिक कमी वयाचा आयर्नमॅन होण्याचा विक्रम अभिषेकने वयाच्या १८ व्या वर्षी केला आहे. आयर्नमॅन होण्यासाठी निर्धारित केलेल्या वेळेपेक्षा कमी वेळेत ही स्पर्धा पूर्ण करत 'आयर्नमॅन' हा जगविख्यात मानला जाणारा मानाचा किताब मिळविला आहे.
बारामतीचे पहिले आयर्नमॅन, तसेच जागतिक पातळीवर तीनदा आयर्नमॅन झालेले सतीश ननवरे हे अभिषेकचे वडील आहेत. आपल्या पित्याकडून प्रेरणा घेत त्यांचेच मार्गदर्शन घेत अभिषेक ने हे यश मिळविले आहे. दक्षिण आफ्रिकेतील पोर्ट एलिझाबेथ येथे ही स्पर्धा पार पडली. या आयर्नमॅन स्पर्धेत अभिषेक याने १३ तास ३३ मिनिटांची वेळ नोंदवून आयर्नमॅन किताब पटकावला. १८० कि.मी. सायकलींग, ४२.२ कि.मी. धावणे व ३.८ कि.मी. समुद्रात पोहोण्याचा या स्पर्धेत समावेश आहे. सर्व आव्हाने एकापाठोपाठ कोणतीही विश्रांती न घेता पूर्ण करायची असतात. यासाठी स्पर्धकांच्या शारिरीक क्षमतेचा कस लागतो. जागतिक स्तरावरील व्यावसायिक स्पर्धक यात सहभागी होतात. मात्र, जिद्दीच्या बळावर अभिषेकने हे आव्हान यशस्वीपणे पेलले.
उत्तम वेळेची कामगिरी नोंदवत त्याने भारतातील ग्रामीण भागातील सर्वात युवा आयर्नमॅन बनण्याची कामगिरी करुन दाखवली. तो बारामतीत तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्याने आयर्नमॅनसाठी तयारी सुरु होती. अभिषेक हा एक व्यावसायिक असून त्याची स्वत:ची सायकल ट्रेडींगची कंपनी आहे. सायकलिंगला प्रोत्साहन मिळावे व युवकांची तब्येत अधिक सुदृढ ठेवण्याचा संदेश अभिषेक याने युवकांना दिला आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |