01:08pm | Oct 24, 2020 |
सातारा: दुष्काळी खटाव तालुक्याच्या विकासाला हातभार लावण्यासाठी तसेच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लोक प्रतिनिधी इतकीच तहसिलदारांची भूमिका ही निर्णायक असते. खटाव तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने याठिकाणी कायम स्वरूपी तहसिलदार उपलब्ध व्हावे, अशी जनतेची अपेक्षा असते. या अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी नूतन तहसीलदार किरण जमदाडे यांनी वडूज येथील शासकीय तहसिलदार निवासस्थानात राहण्याचा निर्णय घेतला आहे. बर्याच कालावधी नंतर या वास्तूला घराला घरपण देणारे आधिकारी लाभणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पन्नास वर्षांपूर्वी खटाव तालुक्याचा कारभार पाहण्यासाठी वडूज नगरीमध्ये शासकीय कार्यालायसोबतच तहसिल कार्यालय कार्यान्वित झाले होते. अधिकार्यांना तालुक्याच्या ठिकाणी राहण्यासाठी सुसज्य निवासस्थान बांधण्यात आले. परंतु त्याकाळी दाट वस्ती नसल्याने काही अधिकारी हे इतर ठिकाणी भाडयाने राहत होते.तर सदर जागेभोवती असलेल्या शासकीय वसाहतीत कर्मचारी कुटूंबासह राहत होते. कालांतराने याठिकाणची डागडुजी होत नसल्याने अनेक कर्मचारी वसाहत सोडून गेल्याने इमारती मोडकळीस सुरुवात झाली. 1970 च्या आसपास अवघ्या पन्नास ते साठ हजार रुपयांमध्ये ही इमारत उभी राहिली. त्याचा वापर केला गेला नसल्याने त्या परिसरात जंगली झाडे, झुडपे, सरपटणारे प्राणी, अतिवृष्टीमुळे दलदल निर्माण झाली होती.नुतन तहसिलदार किरण जमदाडे यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन शासकीय निवासस्थानाचा वापर करण्याचा संकल्प केला त्यानुसार परिसरातील पाहणी केल्यानंतर वडूज नगरीचे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी, बांधकाम विभाग, वन विभाग व इतर यंत्रणेच्या सहकार्याने या निवस्थानाची स्वच्छता, पाणीपुरवठा व वृक्षारोपणाचे नियोजन केले.तसेच तहसिलदार निवासस्थानाने कात टाकल्याने आता खटावकरांना हक्काचा अधिकारी मिळाला असल्याची भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.
तहसिलदार निवासस्थानाची काळजी घेतल्याने या निवासस्थानाला गतवैभव प्राप्त होणार आहे. यापूर्वी या तहसिलदार निवास स्थानात तत्कालीन तहसिलदार प्रभाकर भगत, वैशाली राजमाने, विवेक साळुंखे हे अधिकारी राहून गेले त्यानंतर आता नूतन तहसिलदार किरण जमदाडे हे राहण्यास सुरुवात करून चौकारा मारणार आहेत. त्यामुळे जुने ते सोने याची प्रचिती पुन्हा आली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |