05:07pm | Mar 26, 2022 |
मलकापूर : समोरील कारने अचानक ब्रेक लावल्याने कार थांबण्याचा प्रयत्न करत असतानाच पाठीमागून डंपरने कारला जोराची धडक दिली. इस्लामपूर जवळ झालेल्या या तिहेरी अपघात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. तर एक सात वर्षाची चिमुकली गंभीर जखमी झाली.
अपघात मृत झालेले कराड तालुक्यातील आगाशिवनगर, मलकापूर येथील आहेत. नातेवाईकांकडे वास्तुशांती समारंभासाठी निघाले असता पोळ कुटुंबीयावर काळाने घाला घातला. या अपघाताची माहिती मिळताच आगाशिवनगरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.
अधिकराव जगन्नाथ पोळ (वय ४९), गिताबाई जगन्नाथ पोळ (७०), सुषमा अधिकराव पोळ (४२), सरीता सुभाष पोळ (३५) अशी मृतांची नावे आहेत. तर, समृद्धी सुभाष पोळ (७, सर्व रा. पोळवस्ती, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कराड) ही गंभीर जखमी झाली.
याबाबत माहिती अशी की, आगाशिवनगर येथील पोळ कुटुंबीय नातेवाईकाच्या घरांच्या वास्तुशांती समारंभासाठी आज सकाळी कारमधून सांगलीकडे निघाले होते. यावेळी अधिकराव पोळ यांच्यासह त्यांची पत्नी, आई, पुतणी व भाऊजी असे पाच जण कार मधून निघाले होते. ते पेठ नाका ते इस्लामपूर मार्गे सांगलीकडे जात असताना इस्लामपूर जवळ समोरील कार चालकाने अचानक ब्रेक मारला.
यावेळी पोळ यांनीही त्वरित ब्रेक मारून आपली कार थांबवण्याचा प्रयत्न केला.
त्याचवेळी पाठीमागून आलेल्या डंपरने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात चौघे ठार झाले. तर एक चिमुकली गंभीर जखमी झाली. जखमींवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आगाशिवनगरमधील अधिकराव पोळ यांचे इतर नातेवाईक, कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. तसेच उपचार सुरू असणाऱ्या रुग्णालयांमध्येही नातेवाईकांसह मित्रपरिवाराने गर्दी केली होती. या घटनेमुळे आगाशिवनगरसह परिसरावर शोककळा पसरली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |