12:48pm | Nov 12, 2022 |
दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी याच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सुप्रीम कोर्टाचा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याचा निर्णय पूर्णतः अस्वीकारार्ह व चूक आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी शुक्रवारी यासंबंधी एक निवेदन जारी केले. त्यात ते म्हणाले - "सर्वोच्च न्यायालयाने देशाच्या भावनेनुसार काम केले नाही ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. हे अक्षम्य कृत्य असून, काँग्रेस त्याचा स्पष्ट आक्षेप नोंदवते." राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरंबदूर येथे श्रीलंकेच्या लिबरेशन टायगर्स ऑफ तमिल ईलमच्या (LTTE) एका महिला आत्मघातकी हल्लेखोराने हत्या केली होती. या प्रकरणी न्यायालयाने ७ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली होती.
पण सन २००० मध्ये राजीव यांच्या पत्नी तथा माजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर नलिनी श्रीहरनच्या शिक्षेचे जन्मठेपेत रुपांतर करण्यात आले होते. त्यानंतर २००८ मध्ये राजीव गांधी यांच्या कन्या प्रियंका गांधी वढेरा यांनीही वल्लोर तुरुंगात नलिनीची भेट घेतली होती. २०१४ मध्ये इतर ६ आरोपींच्या शिक्षेतही कपात करण्यात आली होती. त्याचवर्षी तामिळनाडूच्या तत्कालीन मुख्यमंत्री जे. जयललिता यांनी त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.
जिल्ह्यात 5105 पाणी स्त्रोतांची तपासणी |
आयुर्वेदिक गार्डनचा वॉकिंग ट्रॅक सुरू करण्याची मागणी |
तरुणांनी उद्योगविश्वात गरुड झेप घ्यावी |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
अपघात प्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
बांधकाम साहित्याची चोरी करणारी सराईत टोळी गजाआड |
वाई अर्बन बँकेच्या निवडणुकीत १५ जागांसाठी ७२ उमेदवारी अर्ज |
सोनी मराठी वरील कोण होणार करोडपतीच्या स्पर्धकांना २ करोड रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! |
मेट्रोपोलिस हेल्थकेअरने केले कराड येथे प्रगत निदान चाचणी केंद्र सुरू |
डॉ.बाळकृष्ण दामले यांची संचालक पदी निवड |
पाटणला रविवारी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा मेळावा |
तो ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा |
बोगस नळकनेक्शनची पालिकेकडून शोधमोहीम! |
नियमित कर्जफेड करणाऱ्या 24 हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रकमेची प्रतीक्षा |

साताऱ्यात इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मुलींची बाजी |
वडूज पंचायत समितीचा विस्तार अधिकारी लाच लुचपतच्या जाळ्यात |
खिडकीचे गज वाकवून लॅपटॉपची चोरी |
रामाचा गोट येथून युवक बेपत्ता |
विरळी येथे युवकाची आत्महत्या |