पंजाब : पंजाबच्या हरमिलन कौर बैन्सनं ६०व्या राष्ट्रीय ओपन अॅथलेटिक्स चॅम्पियन स्पर्धेत १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. १५०० मीटर धावण्याची स्पर्धा जिंकली आहे. २१ वर्षीय हरमिलने चार मिनिटं ५ सेंकदात अंतर पार केलं. यापूर्वी सुनीता राणीनं चार मिनिंटं ६ सेकंदात अंतर पार करत स्पर्धा जिंकली होती. बुसानच्या २००२ अशियाई स्पर्धेत हा विक्रम प्रस्थापित केला होता.
हरमिलनने ४:०५:३९ सेंकदात १५०० मीटर अंतर पार करत विक्रम आपल्या नावावर केला आहे. “मी आता मोकळपणाने धावू शकते”, असं हरमिलन कौर हीने सांगितलं. हरमिलनच्या घरात दोन क्रीडापटू आहेत. हरमिलन धावपटू अमनदिप सिंह आणि धावपटू माधुरी सिंह यांची मुलगी आहे. त्यामुळे तिच्यावर अपेक्षांचं ओझं होतं. मात्र हे दडपण दूर करत तिने ही कामगिरी केली आहे. विशेष हरमिलनने वारंगलपर्यंत एकटी आली होती. तिचे वडील काही दिवसांनी आले, आणि प्रेक्षकांप्रमाणे स्टॅण्डवरून शर्यत पाहिली. “त्यांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे प्रशिक्षकही दडपणाखाली होते. ते प्रत्येक बारकावे जवळून बघत होते. प्रत्येक तपशीलाबाबत ते सल्ला द्यायचे. त्यामुळे दडपण असायचं. त्यामुळे स्वत: इथे आली”, असं हरमिलन कौर हीने सांगितलं.
“माझ्या प्रशिक्षकांनी पालकांची समजूत घातली. त्यानंतर सतत देखरेख करण्याचं त्यांनी थांबवलं. मला मोकळेपणा हवा आहे, असा त्यांचा सिद्धांत होता.”, असं हरमिलनने पुढे सांगितलं.
“स्पर्धेनंतर अमनदीप यांनी सुवर्णपदकासह मुलीसोबत सेल्फी घेतला. यावेळी दोघांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. मात्र यावेळेही तिने वडिलांना सल्ला ऐकला नाही, हे विशेष. अपेक्षेशिवाय धावणं हे राष्ट्रीय चॅम्पियन बनण्याचं मुख्य कारण आहे. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला ४:१४:६८ असा तिची कामगिरी होती. आता हरमिलननं तिची कामगिरी १० सेकंदांनी सुधारली आहे. वजन कमी करत वेगावर लक्ष केंद्रीत केलं. त्याची तिला मदत झाली.”, असं प्रशिक्षक सैनी यांनी सांगितलं.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |