अहमदाबाद: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातही अपेक्षेप्रमाणे फिरकीची जादू पहायला मिळाली. सुरूवातीला भारतीय फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली. परदेशी पाहुण्यांचाच कित्ता गिरवत भारतीय फलंदाजीही चांगलीस ढेपाळली असली तरी रिषभ पंतच्या दमदार खेळीने भारताचा डाव सावरला. भारताचे 7 गडी बाद झाले असून 281 धावा झाल्या आहेत. भारताकडे आता 76 धावांची आघाडी आहे. वॉशिंग्टन सुंदर 57 तर अक्षर पटेल 6 धावांवर खेळत आहे.
रिषभने अवघ्या 118 चेंडूंमध्ये 2 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने दमदार शतक ठोकल्याने भारताचा डाव सावरला. निम्मा संघ तंबूत परतल्यानंतर देखील रिषभ पंतनं एका बाजूने तंबू ठोकून धावा जमवायला सुरुवात केली. धिम्या गतीने खेळत अर्धशकत पूर्ण करणार्या रिषभ पंतनं पुढच्या 50 धावा वेगाने पूर्ण केल्या. मात्र, अँडरसनच्या उसळत्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रिषभ पंत झेलबाद झाला. मात्र, तोपर्यंत भारताच्या 7 बाद 259 धावा फलकावर लागल्या होत्या.
दरम्यान, पहिल्या दिवसात पाहुण्यांचा आख्खा संघ अवघ्या 200 धावांवर गारद झाल्यानंतर मैदानात आलेल्या टीम इंडियाचीही भोपळाही न फोडता पहिली विकेट पडली आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या छातीत धस्स झालं! शुक्रवारी दुसर्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपेपर्यंत ती काळजी काही खोटी नव्हती हेच स्पष्ट झालं. संघाच्या फक्त 80 धावा फलकावर लागलेल्या असताना भारताची वरची फळी तंबूत परतली देखील!
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एका गडी बाद 24 धावा झाल्या होत्या. दुसर्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा टीम इंडिया धिम्या गतीने का होईना पण डावाला आकार देईल असं वाटत होतं. पुजारा आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीला संथ पण आश्वासक सुरुवात देखील केली. पण कालच्या धावसंख्येमध्ये फक्त 16 धावांची भर घालून पुजारा वैयक्तिक 17 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला.
भरवशाच्या अजिंक्य रहाणेला साथीला घेऊन रोहित शर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 27 धावांवर अजिंक्य रहाणे देखील अँडरसनची शिकार ठरला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपला! त्यानंतर आलेल्या रिषभ पंतला साथीला घेऊन एक बाजू लावून धरणार्या रोहित शर्माने डावाला आकार दिला. ही जोडी स्थिरावत असल्याचं वाटत असतानाच रोहित शर्मा वैयक्तिक 49 धावसंख्येवर असताना बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |