05:16pm | May 27, 2022 |
मुंबई/नवी दिल्ली : कॉर्डेलिया क्रूझ पार्टी प्रकरणात आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं क्लीन चिट दिली आहे. यामुळे एनसीबीचे तत्कालीन विभागीय संचालक समीर वानखेडेंच्या तपासाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. एनसीबीनं शुक्रवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. त्यात आर्यन खानच्या नावाचा उल्लेख नाही. समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून चूक झाल्याची कबुली एनसीबीचे डीजी एस. एन. प्रधान यांनी दिली आहे. त्यामुळे आता वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयानं समीर वानखेडेंविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. वानखेडे आणि त्यांच्या टीमकडून तपास करताना चूक झाली. कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीचा तपास वानखेडेंकडे होता. हा तपास सदोष असल्यानं वानखेडेंच्या अडचणी वाढल्या आहेत. योग्य तपास न केल्याचा ठपका ठेवत गृह मंत्रालयानं वानखेडेंविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. सुत्रांनी याबद्दलची माहिती दिली आहे. वानखेडेंच्या कारवाईबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयानं काढलेल्या आदेशाबद्दल मुंबई एनसीबीकडे विचारणा केली असता, अद्याप तरी याबद्दलचे कोणतेही आदेश मिळाले नसल्याची माहिती त्यांनी दिली.
आर्यन खानकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग्स सापडलं नसल्याचं म्हणत एनसीबीनं त्याला क्लीन चिट दिली. यामुळे वानखेडे आणि त्यांच्या टीमने केलेल्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. याप्रकरणी एका वृत्तवाहिनीनं समीर वानखेडेंशी संपर्क साधला. त्यावर आता मी या प्रकरणाच्या तपासाशी संबंधित नाही. त्यामुळे यावर काहीही बोलू शकणार नाही, असं उत्तर वानखेडेंनी दिलं. कॉर्डेलिया क्रूझ प्रकरणात आर्यन खानला जवळपास महिनाभर तुरुंगात राहावं लागलं होतं.
आर्यन खानवर झालेली अटकेची आधीपासूनच संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. आर्यन खानला क्रूझ टर्मिनलवर अटक करण्यात आल्यापासून त्यांना एनसीबी कार्यालयात आणण्यापर्यंत एनसीबी आणि वानखेडेंवर अनेक आरोप झाले. हे प्रकरण कॅबिनेट नवाब मलिक यांनी लावून धरलं होतं. वानखेडेंसह एनसीबीच्या अनेक अधिकाऱ्यांवर त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते. वानखेडेंचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा आरोपही करण्यात आला होता.
फडणवीस-शिंदे यांचा शपथविधी आजच होणार |
बाळासाहेबांची शिवसेना आम्ही गगनाला गवसणी घालण्याइतपत मोठी करु |
शुक्रवार १ जुलै २०२२ पासून लागू होणार ११ नवे नियम |
मृत कन्हैय्या लालच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी 24 तासांत 1 कोटीचा निधी |
उद्धव ठाकरे च्याविषयी जनमानसात सहानुभूतीची एक प्रचंड लाट |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याचा आम्हालाही आनंद नाही, पण परिस्थितीच अशी उद्भवली |
नव्या मंत्रिमंडळात साताऱ्यातील कोणाची वर्णी लागणार |
भाजप आणि शिंदे गट यांची आधीपासूनच अलिखित छुपी युती |
उद्धव ठाकरेंनी पक्ष वाचवण्यासाठी सत्ता गमावली |
बालविवाह करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चौघांवर गुन्हे |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
4 लाख 30 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सोनके येथे सुमारे 73 हजारांची वीजचोरी; दोघांवर गुन्हे |
कराड येथून 1 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस |
अपघात प्रकरणी चौघांवर गुन्हे |
जिल्ह्यातून दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण |
शेतकऱ्यांनी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान आत्मसात करून शेती करावी : राहुल जितकर |
भाजपच्या महिला व युवक संपर्क प्रमुखांची पनवेल येथे बैठक संपन्न |
किर्लोस्कर पॉवर टिलर्सच्या माध्यमातून शेतीमध्ये घडवून आणत आहे क्रांती |
मलकापूर नगरपंचायतीतील निधी अपहार प्रकरणाची होणार चौकशी |