सातारा : सातार्यात स्वेटर विक्रेत्याकडून खरेदी केल्यानंतर पेटीएम कोडद्वारे पैसे पाठवल्याचे नाटक करुन पैसे न देताच फसवणूक करणार्या ठगाला सातारा शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण (डीबी) विभागाने अटक केली. पोलिस संशयिताकडे असणार्या ऍपची माहिती घेत आहेत. दरम्यान, चौकशीमध्ये संशयिताने सातार्यातील सुमारे 4 व्यवसायिकांना फसवल्याचे समोर आले आहे.
तानाजी बाळकृष्ण जानकर (वय 24, मूळ रा. पळसावडे ता.सातारा सध्या रा.गडकरआळी, शाहूपुरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणी सिरींग टाशिलामो (वय 52, सध्या रा. राधिका रोड, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना दि. 29 नोव्हेंबर रोजी घडली आहे. तक्रारदार यांचा सातारा पंचायत समितीच्या पाठीमागे स्वेटर विक्रीचा व्यवसाय आहे. दि. 29 रोजी दुचाकीवरुन एक अनोळखी युवक तेथे आला. संबंधिताने तक्रारदार यांच्याकडून 2 हजार रुपये किंमतीचे कपडे घेतले. पैसे देण्यासाठी संबंधित युवकाने पेटीएम कोडची मागणी केली असता दुकानदाराने तो कोड दिला. पैसे पाठवल्यानंतर संबंधित व्यक्तीने पैसे पाठवल्याचा सक्सेसफुल मेसेज दाखवला. मात्र दुकानदाराने पाहिले असता पैसे जमा झाले नसल्याचे सांगितले. संबंधित युवकाने हीच संधी साधत त्याने गडबड असल्याचे सांगून पैसे नंतर येतील, अशी बतावणी केली. तसेच काही तक्रार असेल तर त्याने मोबाईल क्रमांक दिला व त्यावर संपर्क करण्यास सांगितले.
दुकानदाराने खात्री केल्यानंतरही पैसे आले नसल्याचे स्पष्ट झाले. संबंधित दिलेल्या फोनवर संपर्क केला असता तो चुकीचा क्रमांक असल्याचे समोर आले. यामुळे तक्रारदार यांनी घडलेल्या घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली. डीबी पथकाने तात्काळ तपासाला सुरुवात करुन संशयिताचे वर्णन घेतले. डीबी पथकाने संशयित युवकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडे असणार्या ऍपची माहिती पोलिस घेत आहेत.
पोनि भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार समीर कदम, पोलिस हवालदार सुजित भोसले, अविनाश चव्हाण, पंकज ढाणे, अभय साबळे, संतोष कचरे, सागर गायकवाड, विक्रम माने यांनी कारवाईत सहभाग घेतला.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |