फलटण : फलटण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष, प्रसिद्ध उद्योजक नंदकुमार आबाजी भोईटे यांचे आज दि.27 ऑगस्ट रोजी लेह – लडाख येथे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने फलटण शहरासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे. सलग 35 वर्षे नगर परिषदेत निवडून जात असताना आपल्या वॉर्डासह शहर विकासाच्या अनेक संकल्पना त्यांनी यशस्वीरित्या राबविल्या होत्या. त्यांच्या कल्पकतेतून शहरातील डेक्कन चौकाचा बदललेला चेहरा-मोहरा याचा साक्षीदार आहे. सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या नंदकुमार भोईटे यांनी कायम गरजवंतांना मदतीचा हात पुढे केला होता. आपत्तीग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, कोरोना काळातील गरजू नागरिकांना मदत, सजाई गार्डन येथे सुरु केलेले कोरोना केअर सेंटर यातून त्यांच्यातील दानशूरपणा फलटणकरांनी सातत्याने अनुभवला होता. बुद्धिकौशल्य, कल्पकता आणि मेहनतीची जोड देऊन सर्वांच्या एकजुटीतून अहोरात्र कष्टाने उभारलेल्या आपल्या उद्योग व्यवसायातही ते यशस्वी ठरले होते. त्यांच्या अकस्तिम निधनाने फलटणच्या राजकीय, सामाजिक, व्यवसाय क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची प्रतिक्रिया सर्वस्तरातून उमटत आहे. दरम्यान, त्यांचे पार्थिव अंत्यविधीसाठी फलटण येथे आणण्यात येणार आहे. याबाबत उद्या सकाळी भोईटे कुटुंबीयांकडून याबाबत कळवण्यात येणार आहे.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |