09:27pm | Apr 16, 2022 |
फलटण : स्वराज पतसंस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर आगवणे याच्यावर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आयुर अर्बन मल्टी पर्पज निधी लि. कंपनीत पैसे दुप्पट, तिप्पट करण्याचे अमिष दाखवत विडणी, ता. सातारा येथील मोहन लक्ष्मण खरात वय 40 यांची सुमारे 30 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दिगंबर रोहिदास आगवणे, त्याची पत्नी जयश्री दिगंबर आगवणे यांच्यासह संतोष तुकाराम आगवणे सर्व रा. गिरवी, ता. फलटण या तिघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दिगंबर आगवणे, जयश्री आगवणे व तुकाराम आगवणे यांनी आपली फसवणूक केली असून त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करावा असा अर्ज मोहन खरात यांनी सातारा जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केला होता. न्यायालयाने खरात यांची तक्रार दाखल करुन घेण्याचे आदेश फलटण शहर पोलीस ठाण्याला दिल्यानंतर दि. 16 एप्रिल 2022 रोजी आगवणे दांपत्यांसह त्यांच्याच कुटुंबातील तुकाराम आगवणे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत मोहन खरात यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी शेती व्यवसाय तसेच शेअर मार्केट मध्ये गुंतवणुक करीत होतो. तसेच माझी मोबाईल शॉपी देखील होती.
माझी सोनवडी, तिरकवाडी येथे शेती असुन माझे शेतीतून चांगले उत्पन्न मिळत होते माझी पत्नी टेलरींगचे कामकाज करीत असल्यामुळे माझी आर्थिक परिस्थिती चांगली असले बाबत दिगंबर आगवणे यांना माहित होते. तसेच ते माझे घरी येत जात होते. त्यांनी मला त्याची आयुर अर्बन मल्टी पर्पज निधी लि.फलटण या नावाची बहुउद्देशीय गुंतवणुक संस्था आहे. त्यामध्ये ब-याच लोकांना पैसे गुंतविण्यास लावलेले आहेत. तुम्ही देखील पैसे गुंतविल्यास त्याचा आम्ही दामदुप्पट तिप्पट चौपट परतावा करुन देत असतो. सदर संस्थेचा संपुर्ण कारभार मी व माझी पत्नी चेअरमन सौ. जयश्री आगवणे व माझा चुलत भाऊ संतोष आगवणे असे घरातीलच लोक पाहत असतो असे सांगितल्याने त्यांचेवर विश्वास ठेवून मी पैसे गुंतविण्यास सुरुवात केली.
मी तुमचे पैसे एका वर्षात दामदुप्पट करुन देतो असे माझे घरी येवुन त्यांनी मला सांगितले. त्यावरुन दि. 12/10/2020 रोजी मी दिगंबर आगवणे यांचेवर विश्वास ठेवुन आयुर अर्बन मल्टी पर्पज निधी लि. फलटण या कंपनीत 1,00,000/- रुपये व 1000/- रुपये गुंतवणुक केली त्या बाबतच्या पावत्या प्राप्त केल्या आहेत. त्यानंतर मी माझे व पत्नीचे दागिने स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा फलटण येथे गहाण ठेवून 5,00,000/- रुपये दि. 09/12/2020 रोजी जमा केलेले आहेत. त्या बाबतच्या पावत्या प्राप्त केलेल्या आहेत. त्यानंतर दि.10/12/2020 रोजी स्वताचे घर विक्री करुन आलेल्या पैशातुन 16,00,000/-रुपयांची एफडी तसेच आई सुलोचना खरात हिचे नावावर दगडूशेठ सराफ मल्टीपर्पज निधी लि. 42/7 मोडून आलेली रक्कम माझे खाते क्र.645201053158 तसेच पत्नी अर्चना मोहन खरात हिचे खाते क्र. 645201053159 या वरुन चार चार लाख रुपये असे एकुण 8,00,000/- रुपये ऑन लाईन एएफटी द्वारे आयुर या कंपनीत गुंतवणुक केलेली आहे.
तसेच दि.11/12/2020 रोजी पुन्हा मी व माझे खात्यातून चार चार लाख रुपये असे एकुण 8,00,000/- रुपये ऑन लाईन एएफटी द्वारे आयुर या कंपनीत गुंतवणुक केलेली आहे. दिगंबर आगवणे यांनी मला वरचेवर भेटुन तुमचे अजुन कोणी नातेवाईक, मित्र असतील तर त्यांचेपण भले होईल त्यांनाही पैसे कमवून देतो. तुम्ही गुंतवणुक केलेली आहे. जास्त पैसे गुंतवणुक केले तर मी माझेकडुन फोरच्यूनर गाडी बक्षीस देईन असे अमिष दाखविले. त्यानंतर मी आगवणे यांना नातेवाईक कोणीही गुंतवणुक करण्यास तयार नसल्याने माझ्या कडील रोख रक्कम 4,00,000/- रुपये, 2,00,000/-रुपये, 2,00,000/- रुपये असे दिलेले आहेत.
दरम्यान, दिगंबर आगवणे यांना दापोली येथे ब्लु डायमंड रिसॉर्ट चालवायला घ्यायचे होते. परंतु त्यांचा बँक सिबील खराब असल्याने त्यांनी हॉटेलचा भाडे पट्टा करारनामा माझ्या नावावर केला. अनामत रक्कम 5, 00, 000/- माझ्या नावावर आगवणे यांचे नातेवाईकांच्या नावावर असलेल्या आयुर ऑल इन शॉपीच्या खात्यावरुन माझ्या खात्यावर ट्रान्सफर केली. त्यानंतर वेळोवेळी त्या हॉटेलच्या डागडुजी व पुर्नजीवन खर्चासाठी रकमा माझ्या खात्यावर पाठविल्या त्या रकमा मी कामगारांना त्यांचे सांगणे प्रमाणे दिलेल्या आहेत. माझे चांगुलपणाचा हॉटेल चालविणेकामी गैरवापर केला. माझे व आगवणे यांचे मैत्री असल्याने त्यांचे सांगण्याप्रमाणे मी वागत होतो. मी गुंतविलेल्या पैशाचा मला एक रुपयाही परतावा मिळालेला नाही.
माझे व आगवणे यांची घनिष्ठ मैत्री झाल्याने ते इनकमटॅक्स वाचविण्यासाठी खर्च करण्यास मर्यादा येवू नये म्हणुन माझे एचडीएफसी बँकेचे रक्कम रुपये 2,70,000/-रुपये दरमहा असलेल्या मर्यादीचे क्रेडीट कार्ड वापरत होते. त्यांनी वेळेवेळी माझे क्रेडीट वापलेले आहे. सदर क्रेडीट कार्डचा वापर त्यांना करता यावा यासाठी त्यांच्या आयुर ऑल इन वन शॉपी या नावच्या बँक खात्यावरुन माझ्या खात्यावर क्रेडीट कार्ड चे पेमेंन्ट करण्यासाठी रक्कमा वेळोवेळी पाठवित होते. दिगंबर आगवणे यांना जेडी केमिकल ॲन्ड फर्टिलायझर नावाची कंपनी काढायची होती. त्यासाठी भांडवल आहे हे दाखविण्यासाठी माझ्या न्यु फेमस मोबाईल शॉपीचे आयडीबीआय बँकेच्या खात्यावर आयुर ऑल इन वन या शॉपीच्या खात्यावरुन 15,00,000/- रुपये ट्रान्सफर केली. ती पुढे त्याच दिवशी जेडी फर्टिलायझर चे डायरेक्टर रणजीत धुमाळ व प्रणय मतकर या दोघांचे नावे ट्रान्सफर केली.
पैसे मागितल्यावर अँट्रॉसिटीची केस करण्याची धमकी
मी गुंतविलेले पैसे दिगंबर आगवणे याने सांगितले प्रमाणे एक वर्षात मिळणारी दामदुप्पट रक्कम मला मिळावी म्हणुन मी सन 2021 मध्ये त्यांच्या मागे लागलो तेव्हा ते मला म्हणाले मला कोट्यावधी रुपये मिळणार आहेत. तुझी रक्कम किरकोळ आहे, तुला मी लवकरच देतो. ते पैसे आल्यावर तुला मी देतो असे म्हणून वेळपणा काढु लागले. मी त्यांना पैसे मागायला लागल्यावर मला माझ्या पत्नीचे नावाने 3,00,000/-रुपयाचा चेक दिला. त्यानंतर आयुर अर्बन मल्टापर्पज निधी लि. फलटण या शाखेच्या खात्यावरुन माझे खात्यावर 60,000/- रुपये आरटीजीएसने ट्रान्सफर केले. त्यानंतर उर्वरीत पैशाची मागणी केली असता मी तुझ्यावर अँट्रॉसिटीची केस करीन, अशी धमकी दिली.
30 लाखातले मिळाले फक्त 3 लाख 60 हजार
मी वारंवार दिगंबर आगवणे यांना प्रत्यक्ष भेटून, फोनवरून व्हॉट्सअपवरती चॅट करुन पैशांची मागणी करु लागलो. ते सगळे कॉल रेकॉर्डींग, व्हॉट्सअप चॅट माझ्याकडे आहेत. माझे गुंतविलेले पैसे एका वर्षाच्या आत देतो असे अमिष दाखवून पैसे गुंतवायला लावले. माझे व माझी पत्नी याचे दागिणे गहाण ठेवुन घराची विक्री करुन आलेल्ा पैशाची एफडी मोडून, रोख रक्कम स्वरुपात एकुण 30,01,000/-रुपये गुंतवणुक केले सदर गुंतवणुकी पोटी परतावा म्हणुन 3,60,000/- रुपये मिळालेले आहेत. दिगंबर रोहिदास आगवणे, सौ. जयश्री दिगंबर आगवणे, संतोष तुकाराम आगवणे यांनी मला एका वर्षांत मला पैसे दामदुप्पट करुन देतो अशी अमिष दाखवून माझी फसवणुक केली आहे.
अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
ते राजकीय आर्थिकदृष्ट्या प्रबळ असुन त्यांनी माझे पैसे हडप केले आहेत. सदर घटनेचे साक्षीदार सौ. अर्चना मोहन खरात व अशोक जयवंत जाधव हे आहेत. म्हणुन वगैरे मजकुरचे फिर्याद जिल्हा न्यायाधीश सो 1 सातारा यांचे न्यायालयात फौजदारी किरकोळ अर्ज क्र. 33/22 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. त्यावरुन मा. न्यायालया कडील जावक क्र. 7147/2022 दि. 12/04/2022 रोजी सदर प्रकरणाचा फौ.प्र. संहीता कलम 156 (3) प्रमाणे तपास करुन अहवाल सादर करणे बाबत आदेश दिल्याने सदर बाबत माझी आरोपी नामे दिगंबर रोहिदास आगवणे, सौ. जयश्री दिगंबर आगवणे, संतोष तुकाराम आगवणे यांचे विरुद्ध भा.द.वि.सं.क.. 405,406,408,409,415,417,420, 468, 471,34 महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ डिपॅजीटर्स ॲक्ट 1999 चे क.3.4.5प्रमाणे कायदेशीर फिर्याद आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |