01:10pm | Jun 30, 2020 |
नवी दिल्ली: चीनमधून तयार झालेल्या कोरोनाने सार्या जगाला वेठीस धरले आहे. सार्या जगाची अर्थव्यवस्था धोक्यात आली असतानाच चीनकडून जगासाठी अजून एक धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनमध्ये आणखी एक नवा स्वाईन फ्लू सापडल्याचा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. अमेरिकन सायन्स जर्नल PANS मध्ये यासंदर्भातील अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. हा नवा स्वाईन फ्लू 2009 मध्ये जगभरात पसलेल्या H1N1 चाच जेनेटिकल डिसेंडेंट असल्याचं म्हणत तो अधिक गंभीर स्वरूपाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
कोरोनावरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देश प्रयत्न करत आहेत. त्यातच या व्हायरची उत्पत्ती चीनमधून झाल्याचा दावाही अनेक देशांकडून करण्यात आला आहे. नवा स्वाइन फ्लू इतका शक्तिशाली आहे की तो माणसाला आजारी पाडू शकतो. जर कोरोना साथीच्या वेळी नव्या स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरला तर तो गंभीर रुप धारण करेल, असं चीनमधील अनेक विद्यापीठं आणि चीनच्या सेंटर फॉर डिजिस कंट्रोल अँड प्रिव्हेंन्शनच्या वैज्ञानिकांकडून सांगण्यात आलं आहे. नव्या स्वाईन फ्लूला जी 4 असं नाव देण्यात आलं आहे. याचा शोध घेण्यासाठी चीनच्या वैज्ञानिकांनी 2011 ते 2018 या कालावधीत संशोधन केलं. तसंच यादरम्यान 10 राज्यांमधील 30 हजार डुकरांच्या नाकातून नमूने घेतले. तसंच या नमून्यांची तपासणीही करण्यात आली.
यावरून चीनमध्ये 179 प्रकारचे स्वाईन फ्लू असल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांमध्ये जी 4 ला वेगळं करण्यात आलं. ज्या डुकरांच्या नाकातून नमूने घेण्यात आले त्यापैकी सर्वाधित डुकरांमध्ये जी 4 स्वाईन फ्लू असल्याचं दिसून आलं. तसंच तो स्वाईन फ्लू या डुकरांमध्ये 2016 पासून असल्याचंही समोर आलं. यानंतर वैज्ञानिकांनी जी 4 वर संशोधन सुरू केला. त्यानंतर समोर आलेल्या गोष्टींमधून सर्वांनाच धक्का बसला.
डुकरांच्या फार्ममध्ये काम करणार्या 10 पैकी एका कामगारामध्ये जी 4 चा संसर्ग झाल्याचं दिसून आल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. तसंच वैज्ञानिकांनी त्यांच्या अँटीबॉडी टेस्ट केल्या. त्यानंतर त्यांना जी 4 चा संसर्ग झाल्याची माहिती समोर आली. 230 जणांच्या केल्या चाचणीत त्यापैकी 4.4 टक्के लोकांना याचं संक्रमण झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या हा व्हायरस मानवामध्ये आला असला तरी तो एकाकडून दुसर्या व्यक्तीला त्याचा संसर्ग होतो का याची मात्र माहिती मिळालेली नाही. सध्या यावर संशोधन सुरू आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |