अजित जगताप
सातारा : खटाव तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या परिसरात सुविधांची वानवा असून नुसते विजेचे पोल उभे होते. मात्र त्या एकही पोलवर एल ई डी बल्ब चालू नसल्याने शासकीय कार्यालय परिसरात सर्वत्र अंधार पसरला होता. पोलीस वसाहतीत जाताना पोलिस व त्यांच्या कुटुंबातील लोकांनासुद्धा अंधारातूनच ये -जा करावी लागत होती. खटाव तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेतलेले किरण जमदाडे यांनी स्वतः लक्ष देऊन या इमारतीच्या परिसरात विजेचा प्रकाश पाडण्याचे काम हाती घेतले. संबधित विभागाला सूचना करून वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम केले. त्यामुळे रात्रीच्या अंधारात असलेली इमारत प्रकाशाने उजाळून गेली आहे.
खटाव तालुक्याचे मुख्यालय म्हणून वडूज नगरीने नावलौकिक प्राप्त केले आहे. शहरात शासकीय, निमशासकीय कार्यालय, दवाखाने, महाविद्यालय व बाजारपेठ असल्याने ग्रामीण भागातून वडुजला येणाऱ्या ग्रामस्थांची संख्या लक्षणीय आहे. तहसील दार यांच्या साठी शासकीय निवासस्थान असून ते बंद अस्वस्थेत होते. मात्र नूतन किरण जमदाडे यांनी खटाव तहसिलदार पदभार स्वीकारताच हे बंद अवस्थेत असलेल्या निवासस्थानाची डागडुजी केली. त्याठिकाणी तहसिलदार राहण्यासाठी जाणार आहेत.
वडूजमध्ये नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यात आल्यानंतर या इमारतीत महसूल विभागाचे कामकाज सुरू झाले. मात्र, परिसरात अनेक दिवसापासून असणारे पथदिवे बंद अवस्थेत होते. या पथदिव्यांच्या केबल खराब झाल्याने परिसरात सर्वत्र अंधार होत होता. याबाबत ही बाब जमदाडे यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या परिसरातील पथदिव्यांच्या कामाची डागडुजी करण्यास सुरुवात केली. आज याठिकाणी पथदिव्यांच्या कामाची लगबग सुरू होती. रात्रीच्या वेळी प्रकाश पाहून अनेकांना सुखद धक्का बसला. अशाच पद्धतीने तहसिल कार्यालयाच्या अखत्यारीत असलेल्या कामांसाठी सुध्दा अशाच प्रकारे गतीमान किरणे पडून पेंडिंग कामांचा अंधार नाहीसा व्हावा, अशी अपेक्षा खटाव तालुक्यातील ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सदरच्या कामासाठी तहसिलदार किरण जमदाडे यांच्या आदेशानुसार वीज जोडणी कारागीर तसेच महसूल विभागाचे कर्मचारी रवि शिंदे यांनी परिश्रम घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.
त्रिमली येथून गॅस सिलेंडर लंपास |
जिहे नजिक अपघातात एक जखमी |
ट्रकमधून 18 लाख रुपयांची वेलची लंपास |
बेदरकारपणे कार चालविणार्या एकावर गुन्हा |
सातारा येथे चेन स्नॅचिंगप्रकरणी दोघांवर गुन्हे |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |
विवाहाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार |
सातार्यात जुगार अड्ड्यावर छापा |
जिल्ह्यात दारु अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यात तिघांची गळफास घेवून आत्महत्या |
बांधकाम भवन बाहेर अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला |
पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू |
अंबेदरे येथे मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हे |
नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जिल्हाधिकारी कार्यालयात जयंती साजरी |
जिल्ह्यात दोन कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
उस उत्पादकांना सर्वाधिक नफा मिळण्यासाठी शेती अधिकार्यांनी तत्पर रहावे : ना. बाळासाहेब पाटील |
68 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |
डंपरच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू |
'जनकल्याण' व 'तीर्थक्षेत्र' आघाड्यांच्या राजकीय आखाड्यात, विषय समित्यांच्या निवडी प्रशासनाच्या कचाट्यात |
जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन |
खासगी सावकाराच्या भूमिकेतून मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडावे |