12:52pm | Oct 03, 2020 |
नवी दिल्ली: अटल टनेल लेह, लडाखची लाइफलाइन बनेल, प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात मोठा बोगदा ‘अटल बोगद्याचे’ आज शनिवारी हिमाचल प्रदेशातील रोहतंग येथे उद्घाटन केले. हा बोगदा जगातील सर्वात मोठा बोगदा आहे. या बोगद्याची लांबी 9.02 किलोमीटर इतकी आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लेह-लडाखमधील शेतकरी, मजूर आणि युवकांना आता राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचणे सोपे होणार आहे. या टनेलमुळे आता मनाली आणि केलांगमधील अंतर 3 ते 4 तासांनी कमी होणार आहे, असे सांगतानाच दुर्गम भागात 3 ते 4 तासांचे अंतर कमी होण्याचा अर्थ काय असतो हे हिमाचल प्रदेशातील माझ्या बंधुभगिनींना चांगलाच माहीत आहे, असे मोदी म्हणाले.
या बोगद्यामुळे हिमाचल प्रदेशातील जनतेला तर मोठा फायदा होईलच, परंतु भारतीय लष्कराला रसद पुरवणे हे काम देखील सोपे होणार आहे. तसेच चीनकडील सीमेवर कोणत्याही ऋतुमध्ये पोहोचणे देखील आता सोपे होणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
अटल टनेल भारताच्या सीमेवरील पायाभूत सुविधांना नवी शक्ती प्रदान करणारा ठरणार आहे. अटल टनेल हा जागतिक पातळीवरील सीमासंपर्काचे एक जीवंत उदाहरण आहे, असे मोदी म्हणाले. गेल्या सहा वर्षांच्या काळात आमच्या सरकारने जुनी परिस्थिती बदलण्याच्या दिशेने अभूतपूर्ण प्रयत्न केले आहेत. हिमालय क्षेत्र, जम्मू आणि काश्मीर, कारगील, लेह-लडाख, उत्तराखंड, सिक्किममध्ये अनेक प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. या बरोबरच अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गाला असल्याचे मोदी म्हणाले.
या उद्घाटन समारोहात पंतप्रधान मोदी यांच्यासह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखील उपस्थित होते. या बोगद्यामुळे आता मनाली आणि लेहदरम्यानचे अंतर 46 किलोमीटरने अंतर कमी झाले आहे. तसेच संपूर्ण प्रवासाचा वेळ चार ते पाच तासांनी कमी होणार आहे.
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |