05:55pm | Dec 24, 2020 |
वाई : बनावट सीमकार्ड व फेसबुक अकाऊंटद्वारे मुली व महिलांशी ओळख तयार करून त्यांचे प्रोफाईलवर असलेले फोटो अश्लील पद्धतीत तयार करुन ते सोशल मीडियावर टाकणार्याच्या मुसक्या आज वाई गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने आवळल्या. त्याला वाई न्यायालयात हजर केले असता दि.25 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फेसबुकच्या माध्यमातून स्वत:चे बनावट अकाऊंट काढून मुली व महिलांची सोशल मीडियावर बदनामी केली जात होती. अशाच पद्धतीने दि.25 जानेवारी ते दि.30 जानेवारी दरम्यान एका मुलीस बनावट फेसबुक अकाउंट वरुन प्रथम तिच्याशी फेसबुक मेसेंजर ऍपवर चॅटिंग करण्यात आले. चॅटिंग करताना तिचा विश्वास संपादन करुन तिच्याकडून तिचा व्हॉटसऍॅप नंबर घेण्यात आला. यानंतर संबंधित मुलीचे तिच्या फेसबुकवरील फोटो डाऊनलोड करुन त्या फोटोमधील तिच्या चेहर्याचा वापर करुन अश्लिल फोटो तयार करण्यात आलेे. यानंतर ते फोटो तिला तिच्या व्हॉटसऍॅप पाठविले तसेच बनावट फेसबुक अकांउंटवरही अपलोड केले गेले होते. याबाबतची माहिती होताच संबंधित मुलीने वाई पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
या गुन्हाच्या तपासकामी पो.नि.आनंदराव खोबरे यांच्या सूचनांनुसार गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी यांनी अज्ञात आरोपीचा तांत्रिक पध्दतीने व बातमीदारामार्फत तपास केला असता या गुन्ह्यातील आरोपी प्रवीण रेमजे (मूळ रा. रेमसेवाडी, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी, हल्ली रा. जनता वसाहत, पर्वती पायथा, पुणे) याने आकाश मनोहर खरात (रा.केसापूरी वडवनी, ता. जि. बीड) याच्या नावावर असलेल्या सिमकार्डचा वापर करुन बनावट फेसबुक अकाउंट उघडले असून त्या मोबाईल नंबरद्वारे रेमजे याने वाशी, रत्नागीरी, वाई येथील मुली व महिलांशी फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून चॅटिंग केले असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, संशयिताचे सर्व मोबाईल बंद लागत होते व त्याच्या सध्याच्या ठावठिकाणाची माहिती प्राप्त होत नव्हती.
पो.नि. आनंदराव खोबरे यांना आज खास बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानुसार संशयित प्रविण रेमजे याला सापळा रचून खानदेशी हॉटेल, सिंहगड रोड, पुणे येथून अटक करण्यात आली. रेमजे याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सुमारे 2 वर्षापूर्वी पुणे येथील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करताना त्याचा साथीदार आकाश खरात याचे कार्ड त्याला सापडले होते. त्या सीम कार्डचा वापर करुन त्याने महिलांशी बनावट फेसबुक अकाउंटद्वारे ओळख वाढवून त्यांचे फेसबुकवरील फोटो मॉफींग करुन त्यांचे अश्लील फोटो व्हॉटस् ऍप व फेसबुकवर अपलोड केले असल्याचे कबूल केले आहे.
रेमजे यास वाई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रेमजे यास दि.25 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. या संशयिताने अशाच प्रकारे विविध ठिकाणी गुन्हे केले असून त्याच्याविरुध्द वाशी, नवी मुंबई, रत्नागीरी जिल्ह्यात तक्रारी दाखल असल्याचे समजून आलेले आहे.
या कारवाईत पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. आनंदराव खोबरे यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय शिर्के, कृप्णराज पवार, पो.ना.प्रशांत शिंदे, पो.कॉ.सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, श्रावण राठोड, अक्षय नेवसे यांनी सहभाग घेतला होता.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |