11:27am | Mar 23, 2022 |
नवी दिल्ली : हैदराबादमध्ये भंगाराच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या भीषण आग लागली. या भीषण आगीत आतापर्यंत ११ मजुरांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या आगीत आणखी १२ मजूर अडकल्याची भीती देखील व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ कामगार पहिल्या माळ्यावर झोपले असतानाच तळमजल्यावर गोडाऊनला आग लागली. यावेळी कामगारांकडे तेथून बाहेर पडण्यासाठी तळमजल्यावरुन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र शटर बंद होते असे सेंट्रल झोनचे डीसीपी राजेश चंद्रा यांनी सांगितले आहे. 'एक कामगार इमारतीमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाला असून त्याला सध्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे,' अशी माहिती हैदराबादचे पोलीस आयुक्त सी. व्ही. आनंद यांनी दिली आहे.
अग्निशमन दलाला पहाटे ३ वाजता आग लागल्याची माहिती मिळाली आणि त्यानंतर नऊ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. तब्बल तीन तास अग्निशमन दलाचे जवान आग विझवत होते. गोडाऊनमधील फायबर केबलमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मृत्यू झालेले अनेकजण हे स्थलांतरित कामगार असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
'भंगाराच्या गोडाऊनमध्ये दारुच्या मोकळ्या बाटल्या, पेपर, प्लास्टिक, केबल अशा अनेक गोष्टी होत्या. पहिला माळा दुसऱ्या माळ्यासोबत जोडला होता. पहिल्या माळ्यावर दोन रुम होत्या. सर्व ११ मृतदेह एकमेकांच्या अंगावर पडलेले होते. मृतदेहांची ओळखही पटू शकत नाही इतके जळाले आहेत,' अशी माहिती पोलिसांनी दिली.
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |

कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |