08:38pm | Jan 18, 2023 |
सातारा : आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गासोबतच फलटण शहरामधून जो पालखी मार्ग मार्गस्थ होत आहे, तो मार्ग सुद्धा व्यवस्थित करून त्याचे सुशोभीकरण करण्याची मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यानुसार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी फलटण शहरामधून जाणारा पालखी मार्गाचे काम सुद्धा दर्जेदार होईल, असे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिले आहे.
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा फलटण शहरांमधून मार्गस्थ होत असतो. आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गाचे काम सध्या फलटण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालू आहे. यामध्ये फलटण शहरामधून जाणारा पालखी मार्ग समाविष्ट नव्हता; परंतु खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण शहरामधून जाणारा पालखी मार्ग दर्जेदार करून त्याचे सुशोभीकरण सुद्धा करण्यात यावे, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. या मागणीस केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी हिरवा कंदील दाखवलेला आहे.
फलटण शहरामधून मलठण, उमरेश्वर चौक, पाच बत्ती चौक, श्रीराम मंदिर, गजानन चौक, श्रीमंत मालोजीराजे पुतळा, गिरवी नाका या मार्गावरून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा मार्गस्थ होत असतो. आळंदी-पंढरपूर हा पालखी महामार्ग लवकरच साकार होत आहे. यामध्ये फलटण शहराच्या बाहेरून पालखी महामार्ग जात असल्याने शहरामधील जो पालखी मार्ग आहे; तो मार्ग प्रलंबितच राहत होता. यासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेऊन हा शहरातून जाणारा मार्ग सुद्धा पालखी महामार्गामध्ये समाविष्ट करावा, अशी मागणी केली. त्यास नितीन गडकरी यांनी मान्यता देत लवकरच यावर कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले.
फलटण शहराला ऐतिहासिक असा वारसा आहे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली फलटण ही नगरी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे फलटण हे आजोळ आहे. श्री चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने फलटण नगरी ही पावन झालेली आहे. महानुभाव पंथीयांची दक्षिण काशी म्हणून फलटणची ओळख आहे. श्री संत हरीबुवा महाराज व श्री संत उपळेकर महाराज यांचे वास्तव्य सुद्धा फलटणमध्ये मोठा काळ होते. अशा या फलटण नगरी मधून जात असलेल्या पालखी मार्गाचे काम आळंदी पंढरपूर राष्ट्रीय महामार्गामधूनच करण्यात यावे, अशी मागणी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केलेली होती.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |