03:52pm | Oct 04, 2022 |
मुंबई : महाराष्ट्राच्या ऋतिका श्रीराम हिने 36व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आणि खऱया अर्थाने 'जलपरी'चा मान मिळवला. तिने स्प्रिंग बोर्डवरून सूर मारताना अचूकता व लवचिकता याचा सुरेख समन्वय दाखवीत सर्वाधिक गुणांची कमाई केली.
ऋतिका श्रीरामने यापूर्वी शालेय आणि खुल्या गटातील अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भरघोस पदके मिळविली आहेत. नवी दिल्ली येथे 2010मध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. राज्य शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार तिला मिळाला आहे.
ईशा वाघमोडेला कास्य पदक
याच क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या इशा वाघमोडे हिने कास्य पदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. सोलापूरच्या या खेळाडूने आतापर्यंत शालेय राष्ट्रीय, सब ज्युनिअर व जुनियर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. सन 2016मध्ये तिने श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत दोन सुवर्ण पदके जिंकली होती.
डायव्हिंगला वाहून घेणारे कुटुंब
पुरुषांच्या तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या आदित्य गिरामला कास्य पदक मिळाले. आदित्य याने यापूर्वी जागतिक स्तरावरील स्पर्धेतही हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले आहे. आदित्य, निहाल व बिल्वा या भावंडांनी आजपर्यंत महाराष्ट्राला शालेय, सब ज्युनियर, ज्युनियर व वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला डायव्हिंगमध्ये अनेक पदके मिळवून दिली आहेत.
महाराष्ट्राचे दोन्ही खोखो संघ अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो-खो संघांनी आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत धडक दिली. हे दोन्ही संघ आता सुवर्ण पदकापासून केवळ एक पाऊल दूर आहेत. दोन्ही गटांतील अंतिम लढती मंगळवारी होणार आहेत. संस्कारधाम इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या खो-खो स्पर्धेत महिला गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने दिल्लीचा 22-14 (22-6) असा एक डाव 8 गुणांनी धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली. पुरुष गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्राने कर्नाटकवर 26-10 असा एक डाव आणि 4 गुणांनी विजय नोंदवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
युवकाचे अपहरण करून त्याचा खून केलेले संशयित 36 तासात रत्नागिरी येथून जेरबंद |
गर तू मेरा नही हो सका, तो किसी और का होने नहीं दूंगी... |
वाढे फाटा येथील मारेकरी ताब्यात; सूत्रधार कोण? |
दोन लाखांचे दागिने घेऊन कारागीर पळाला |
एकाची 35 लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
टेस्टिंग सर्टिफिकेटच्या आमिषाने सुमारे 97 हजारांना गंडा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अपघातातील जखमीचा मृत्यू |
बैलगाडीतून पडून महिलेचा मृत्यू |
दहावीतील मुलांनी धाक दाखवण्यासाठी चक्क क्लासमध्ये नेला कोयता |
राज्यात आदर्शवत ठरतील असे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र व आदर्श शाळा तयार करा : पालकमंत्री शंभूराज देसाई |
हॉटेलमध्ये विसरलेले १४ तोळे दागिने मिळाले परत |
रेशनिंग दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचे जिल्हा प्रशासनाला निवेदन |
कराडचा उड्डाणपूल पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हिरवा कंदील... |
खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ |
तांब्याच्या तारेची चोरी |
नोकरीच्या आमिषाने तब्बल चार लाख 99 हजाराची फसवणूक |
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा दाखल |
मध्यमवर्गीय, शेतकरी, गोरगरीबांना न्याय देणारा अर्थसंकल्प |