सातारा : सातारा तालुक्यातील पिंपळवाडी येथे कुटुंबातील तिघांना शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. अतुल इंगळे आणि संतोष इंगळे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे असून रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सुरेश भानुदास इंगवले (वय ३९, रा. किडगाव, ता. सातारा) हे शिक्षक असून त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शनिवार, दि. १६ रोजी ते त्यांच्या शेतीमध्ये ज्वारी पेरणीसाठी गेले होते. यावेळी बैले चारण्याच्या कारणावरुन सुरेश इंगवले यांचे वडील भानुदास यांना अतुल प्रकाश इंगळे आणि संतोष प्रकाश इंगळे (रा. पिंपळवाडी, ता. सातारा) या दोघांनी एकेरी भाषेत वाईट बोलून शिवीगाळ केली आणि हातात दगड घेवून अंगावर धावून आले. ही भांडणे सुरु असताना सुरेश आणि त्यांची आई पुढे आले असताना त्यांनाही दमदाटी करत धमकावण्यात आले. यावेळी सुरेश यांच्या पोटावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. अतुल इंगळे याने सुरेश यांच्या हातावर आणि पाठीवर कळकाच्या बांबुने मारहाण केली. यात सुरेश यांच्या हाताचे बोट मोडल्याने गंभीर दुखापत झाली आहे.
दरम्यान, याप्रकरणी सुरेश यांनी सोमवार, दि. १८ रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर अतुल इंगळे आणि संतोष इंगळे या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक करण्यात आलेली नव्हती. अधिक तपास पोलीस नाईक राऊत करत आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |