04:07pm | Jan 15, 2021 |
सातारा: तमाम शिवभक्तांच्या भावनांचा आदर करत सातारा पालिकेने दि.12 जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन केले. किल्ले अजिंक्यतारा सुशोभिकरणासाठी पालिका भरीव तरतूद करणार असल्याची घोषणा करण्यात आली. सप्टेंबर 2020 मध्ये देण्यात आलेल्या निवेदनाप्रमाणे पालिकेने केलेल्या कार्याबद्दल तमाम शिवभक्तांसह पालिकेचे धन्यवाद मानतो तसेच पालिकेने आता त्रिशं़कू भागाबाबत नियोजनात्मक विकास होण्यासाठी तातडीने विशेष बैठक बोलवावी, अशी मागणी अॅड. सचिन तिरोडकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे .
याबाबत नगराध्यक्षा माधवी कदम यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षे प्रलंबीत असलेला सातारा नगरपरिषदेचा हद्द वाढीचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने दि.7 सप्टेंबर 2020 रोजी मंजूर केला. या हद्दवाढीच्या माध्यमातून ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ला सातारा नगरपरिषदेच्या हद्दीमध्ये समाविष्ट झाला आहे. त्या अनुषंगाने मी दि.25 सप्टेंबर 2020 रोजी आपणास निवेदन दिले होते. व त्या निवेदनाव्दारे किल्ले अजिंक्यतारा च्या सुशोभी करणासाठी व संवर्धना साठी सातारा नगरपरिषदेच्या वार्षिक अंदाजपत्रकामध्ये भरीव निधीची तरतुद दर वर्षी करण्यात यावी अशी मागणी मी केलेली होती. तसेच सातारा विकास आघाडीचे पक्षप्रतोद नगरसेवक निशांत पाटील यांनी देखील सातारा नगरपरिषदेची विशेष सभा बोलविण्या बाबत माझ्या मागणीचे समर्थन केलेले होते व विशेष सभा बोलविण्या बाबत पाठपुरावा करणार असल्याचे पत्रक काढले होते.
माझे मागणी प्रमाणे तसेच तमाम शिवभक्तांच्या भावनांचा आदर करुन सातारा नगरपरिषदेने दिनांक 12/1/2021 रोजी किल्ले अजिंक्यतारा येथे विशेष सभेचे आयोजन करुन सदर सभेमध्ये किल्ले अजिंक्यताराच्या सुशोभी करणासाठी वार्षीक अंदाज पत्रकामध्ये तरतुद करणेची घोषणा केली. याचा मनस्वी आनंद होत आहे व याबाबत मी सातारा नगरपरिषदेला अनेक अनेक धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. तसेच शाहुनगर त्रिशंकु भागाच्या इतर नागरी सोयी सुविधा पुरविणे बाबत व शाहुनगर त्रिशंकु भागाच्या नियोजबध्द विकासासाठी सातारा नगरपरिषदेची विशेष सभा तातडीने बोलविण्यात यावी ही विनंती.
सातारा शहरातील तीन कॅफेंवर कारवाई; 9 जणांवर गुन्हे |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |

मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |