04:05pm | Apr 06, 2021 |
पुसेगाव: महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. त्या आपल्या बचत गटाच्या माध्यमातून सदैव महिलांच्या उन्नतीसाठी कार्यक्षम आहेत. महिलांनी स्वावलंबी व्हावे यासाठी आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो, असे मत आखिल भारतीय महाक्रांती सेना राष्ट्रीय महिला आघाडीच्या अध्यक्षा जयश्री सावर्डेकर (माई) यांनी वडूज येथे केले. तसेच सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या, येरळा परिवारांने केलेला सत्कार हा पुढील वाटचालीस ऊर्जा देणारा ठरेल.
येरळा परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या विविध मान्यवरांच्या सत्कारात खटाव तालुक्याच्या पाहणी दौर्यावर आलेल्या जयश्री सावर्डेकर (माई) यांचा सत्कार खटाव पंचायत समितीच्या सदस्या मेघाताई पुकळे यांच्या हस्ते, निमसोड गावचे सुपुत्र, युवा उद्योजक श्रीकांत देवकर यांची रासप युवकच्या जिल्हाधक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदिप मांडवे यांच्या हस्ते तर वडूजच्या शारदा भस्मे यांची महाक्रांती सेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेबददल तर नवनिर्वाचित निढळच्या सरपंच बायडाबाई ठोंबरे, गोसाव्याचीवाडीचे सरपंच गजानन कुर्हाडे, उपसरपंच देविदास फडतरे यांचा व इतर मान्यवर पदाधिकार्यांचा सत्कार येरळा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला.
बेलापूर (नवी मुंबई) स्थित्य वास्तव्यास असलेल्या जयश्री सावर्डेकर (माई) यांनी आतापर्यत आपल्या जीवनात सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक क्षेत्रात, अनाथ -अपंग, निराधार पुरुष - महिला, युवक -युवती व महिला बचत गटातील महिलांना येणार्या अडीअडचणीच्या काळात महिलांना मदत करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. याबददल शासनाच्या वतीने व विविध संस्थाच्या वतीने त्यांना आंतरराष्ट्रीय 24 पुरस्कार, राष्ट्रीय 26 पुरस्कार, राज्यस्तरीय 434 पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे. कोविड योध्दा म्हणून त्यांना आता पर्यत 153 सन्मापत्राने विविध संस्थांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी युवा उद्योजक जीवनशेठ पुकळे, सरपंच अॅड.रोहन जाधव, लालासो माने - पाटील, सोमनाथ साठे, रणजीत फडतरे, धनाजी चव्हाण, केतन गोडसे, अधिक जगदाळे, संतोष पाटोळे, सचिन साठे, संदिप फडतरे, रामभाऊ निंबाळकर आदींसह येरळा परिवार सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद कदम यांनी केले तर समीर तांबोळी यांनी आभार मानले.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |