08:48pm | Nov 21, 2021 |
पाटण : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी पाटण सोसायटी मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले. एकूण १०२ मतांपैकी सर्वच्या सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीसाठी सभासद मतदारांसह माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, ना. शंभुराज देसाई, राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी आपला मतदानाचा हल्ला बजावला. अत्यंत चुरशीच्या वातावरणात दोन्ही बाजूंनी स्पर्धात्मक मतदान झाले. मतदान प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडली असून मंगळवारी पाटणमध्ये कोणाची वियाजी मिरवणूक निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
येथील कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमध्ये शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी आठ वाजण्यापुर्वीच मतदान केंद्रावर सोसायटी मतदारसंघातील मतदारांनी रांगा लावून उत्साह दाखवला. सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटणकर गटाच्या, तर देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली देसाई गटाच्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजावत शंभर टक्के मतदान केले.
पाटण सोसायटी मतदारसंघातून एकूण १०४ ठराव झाले होते. त्यापैकी घोटचा ठराव बाद झाला. तर बनपुरी येथील एका मतदाराचा मृत्यू झाल्याने १०२ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये उमेदवार ना. शंभुराज देसाई, सत्यजितसिंह पाटणकर यांच्यासह राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, टाटाचे नेते कामगार नेते सुजित पाटील आदी. मान्यवर, पदाधिकारी व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सकाळपासून अत्यंत चुरशीने मतदान पाहायला मिळाले. मतदान केंद्राबाहेर पाटणकर, देसाई समर्थकांसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली.
दरम्यान, याठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मतदान केंद्रावर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी भेट दिली. पाटणचे पो.नि. एन.आर. चौखंडे व मल्हारपेठचे स.पो.नि. उत्तम भापकर यांनी चोख पोलीस बंदोबस्तात शांततेत ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली.
या निवडणुकीत सोसायटी मतदारसंघासाठी १०३ पैकी एक मयत मतदार वगळता इतर सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. नागरी पतसंस्था मध्ये २९ पैकी २९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय अन्य महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्गीय, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पादन प्रक्रिया, गृहनिर्माण, दूध संस्था, औद्योगिक विणकर आदींसाठीच्या २०३ मतदारांपैकी १९७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
मतदार जिल्हा बँकेची परंपरा अबाधित ठेवतील
जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकरी, सभासद, कामगारांची अर्थवाहिनी आहे. आजपर्यंतचा बँकेचा नावलौकिक जगजाहीर असल्याने येथे चांगली माणसं निवडून जाण्याची परंपरा आहे. यावेळीही हीच परंपरा अबाधित ठेवत मतदार अत्यंत विश्वासाने सत्यजितसिंह पाटणकर यांना निवडून देतील. पाटण विधानसभा मतदार संघात आगामी काळात जिल्हा बँकेमार्फत चांगल्या पद्धतीचे कामकाज होईल.
- माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |