02:45pm | Sep 22, 2020 |
फलटण: कोरोना संकटकाळात फलटण शहरात सध्या अत्याधुनिक स्मशानभूमीची आवश्यकता असून सद्यस्थितीत असणारी स्मशानभूमी अपुरी पडत असल्याने कोळकी येथील स्मशानभूमीचा वापर करावा लागत आहे. पर्यावरण रक्षण तसेच शास्त्रीय दृष्टीकोन विचारात घेता अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच्या प्रश्नाकडे फलटण नगरपरिषदेचे गांर्भार्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नगरसेवक सचिन सूर्यवंशी-बेडके यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे केली आहे.
फलटण शहरात सध्या कोरोना संकटाचा हाहाकार सुरू आहे. अंत्यसंस्कारासाठी उपलब्ध असणार्या स्मशानभूमी कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत एकाच स्मशानभूमीवर अवलंबून राहणे चुकीचे आहे. स्मशानभूमी प्रश्नी मार्ग काढण्यासाठी अनेक पर्याय समोर आहेत. या पर्यायांमध्ये नगरपरिषदेच्या तसेच काही समाजाच्या जागा नव्या स्मशानभूमीच्या उभारणीसाठी वापरता येवू शकतात. शिंगणापूर रस्त्यावर ओढ्या लगतचे जुने महिला वसतीगृह व त्याच्या पिछाडीची सुमारे तीन एकर जागा ही फलटण नगरपरिषदेच्या मालकीची आहे. ओढ्याच्या कडेला विद्यानगर लगत अशीच तीन ते चार एकर जमीन फलटण नगरपरिषदे करीता आरक्षित करण्यात आली आहे. शुक्रवार पेठेतील वेलणकर दत्तमंदिरचे पिछाडीस बाणगंगा नदी लगत जे मुस्लीम कब्रस्तानालगत दहावा शेड आहे. फलटण - सातारा रस्त्यावरील बाणगंगा नदी वरील पुलाचे लगत उत्तर व दक्षिण बाजूस जागा आहे. रस्त्यावर पुल ओलांडल्यावर त्याचे लगत वडार समाजातील लोकांची स्मशानभूमीसाठीची पारंपारिक एक एकर पेक्षा जास्त जागा आहे. अशा विविध ठिकाणी जागा उपलब्ध असून या जागांवर फलटण नगरपरिषदेने तातडीने नव्याने अत्याधुनिक विद्युत अश्या स्मशानभूमीची उभारणी करावी, असेही सचिन सूर्यवंशी - बेडके यांनी स्पष्ट केले आहे.
या नव्या स्मशानभूमी उभारताना किमान एका ठिकाणी विद्युत, सोलर, गॅसवरील किंवा डिझेल वर चालणारी अग्नीदाहिणी उभारण्यात यावी. म्हणजे पुढील काळात पर्यावरणाचा र्हास टाळता येऊ शकतो व सध्याच्या कोरोना महामारी सारख्या किंवा इतर गंभीर आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर योग्य प्रकारे शास्त्रीयदृष्ट्या अंत्यसंस्कार करता येऊ शकतील. सदर अर्जावर नगरपरिषदेने तातडीने विचार करून महाराष्ट्र शासनाकडे यासंबंधित प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणीही नगरसेवक सचिन सूर्यवंशी- बेडके यांनी केलेली आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |