02:10pm | May 19, 2022 |
मुंबई : गुरुवारी सकाळी बाजार उघडताच गुंतवणूकदारांना (investors) मोठा झटका बसला. 1 हजारपेक्षा जास्त अंकांनी बाजार कोसळल्याचा फटका गुंतणवूकदारांच्या खिशाला बसलाय. तब्बल 5 लाख कोटी रुपयांचा चुराडा गुरुवारी सकाळी झालेल्या शेअर बाजारातील पडझडीमुळे झाल्याचं दिसून आलंय.
जागतिक बाजारातील घडामोडींचे परिणाम मुंबई शेअर मार्केटवर दिसून आले. शेअर बाजारात गुरुवारी 1 हजार 154.78 अंकांनी सेन्सेक्स घसरल्यानं गुंतवणूक दारांना मोठा धक्का बसला. त्यामुळे सेन्सेक्स 53 हजारपर्यंत घसरला. याचा थेट परिमाम कंपन्यांच्या मार्केट कॅपवर झाल्या. बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 5 लाख कोटी रुपयांनी गडगडलेत. फक्त सेन्सेक्सच नव्हे तर निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली.
नेमकं किती रुपयांचं नुकसान?
शेअर बाजारातील पडझडीमुळे शेअर मार्केटमधील लिस्टेड कंपन्याच्या भांडवली मूल्यावर परिणाम झाला.
1. किती कोटी रुपयांचं नुकसान 5,02,731.03 कोटी
2. आता किती झालं मार्केट कॅप – 2,50,74,714.78 कोटी
कोणत्या कंपन्यांना सर्वाधिक फटका?
शेअर बाजारातील पडझडीचा फटका टेक महिंद्रा, इन्फोसिस, विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, इंटसइंड बँक आणि टीसीएस यांना बसलाय. फक्त आयटीसी चा शेअर पडझडीमध्ये स्थिरावला होता. शांघाय, हाँगकाँग आणि टोकीय येथील आशियाई बाजारही घसरल्याचा फटका मुंबई शेअर मार्केटवर जाणवलाय. दरम्यान, बुधवारी अमेरिकेतील स्टॉक एक्स्चेंजमधेही मोठी घट पाहायला मिळाली होती. अमेरिकेतील बाजारात जून 2020 नंतर पुन्हा भीतीदायक स्थिती दिसत असल्याचं जाणकारांचं मत आहे. सध्याच्या घडीला आंतराष्ट्रीय बाजारात तेलाची किंमत ही 1.63 टक्क्यांनी वाढलीय. प्रति बॅरल 110.89 रुपये डॉलर इतकी किंमत सध्या कच्च्या तेलाची नोंदवण्यात आली आहे.
मात्र आता शेअर बाजारातील पडझडीनंतर गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतल्याचं चित्रही दिसून येतंय. मोठ्या आर्थिक नुकसानीचा फटका बसल्यानं गुंतवणूकदार कमालीचे धास्तावलेले आहेत.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |