09:29pm | Mar 30, 2021 |
फलटण : माजी खासदार दिवंगत हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी पाहिलेले फलटणच्या रेल्वेचे स्वप्न त्यांचे सुपुत्र खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूर्ण केले असून फलटण-पुणे रेल्वे सुरु झाल्यामुळे या भागाच्या विकासाला आणि प्रगतीला हातभार लागणार आहे. रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी खा. रणजितसिंह यांनी केलेले प्रयत्न अभिमानास्पद असल्याचे केंद्रीय पर्यावरण, वन, माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
फलटण येथील रेल्वे स्टेशन वर फलटण ते पुणे ट्रेनच्या व्हिडीओ लिंकद्वारे उद्घाटन प्रसंगी प्रकाश जावडेकर बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले, खासदार गिरीश बापट, मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सुनील मित्तल, पुणे विभागाच्या रेल प्रबंधक रेणू शर्मा, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, मंदाकिनी नाईक-निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या जिजामाला नाईक-निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे, रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पूर्वी मी पुणे पदवीधर मतदार संघाचा आमदार असताना फलटणला वारंवार येत होतो. त्यावेळी माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांची भेट होत असे. त्यावेळी फलटणच्या रेल्वेसाठी सातत्याने ते आग्रही असायचे. त्यांनी रेल्वेचे पाहिलेले स्वप्न त्यांचे सुपुत्र विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी पूर्ण केल्याबद्दल समाधान वाटत असून फलटण-पुणे रेल्वेद्वारे एकमेकांशी सरळ जोडले गेल्याने या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मालालाही चांगली बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार आल्यापासून मोठ्या प्रमाणात जनहिताची कामे सुरू असून रेल्वेचा पूर्णपणे चेहरा-मोहरा बदलला गेला आहे. सर्व रेल्वे स्टेशन स्वच्छ होण्याबरोबरच वाय-फायद्वारे सुसज्ज झाली आहेत. अनेक रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरण करण्यात येऊन प्रवाशांना रेल्वेमध्ये अनेक सोयी-सुविधा देण्यात आल्या आहेत. रेल्वेचे बजेट मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आले असून आमच्या सरकारच्या काळात रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रगती केल्याचे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
फलटणचा रेल्वेसाठी माझे वडील दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी मोठा संघर्ष केला. त्यांचे स्वप्न फलटण ते पुणे रेल्वेद्वारे आज पूर्ण होत असून फलटण व आजूबाजूच्या औद्योगीकरनाला, छोटे-मोठे उद्योगधंदे, शेतकरी यांच्या मालाला निश्चितच फायदा रेल्वेच्या वाहतुकीमूळे होणार आहे. लवकरच फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर रेल्वे मार्गाचे काम सुरु होणार आहे. रेल्वेसाठी 23 वर्षे सतत संघर्ष करणारे माझे वडील दिवंगत हिंदुराव नाईक-निंबाळकर आज आपल्यात नसल्याने त्यांची उणीव उदघाटन कार्यक्रमाला जाणवत असल्याची खंत खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केली.
फलटण सारख्या दुष्काळी तालुक्यात रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेचे सर्व अधिकारी यांचे मोठे योगदान असून गेले वर्षभर कोरोना काळात मोठ्या प्रमाणात रेल्वेसेवा बंद असतानाही फलटण ते पुणे रेल्वे सुरू करून रेल्वे मंत्रालयाने फलटणकरांना अनोखी भेट दिली असून फलटणची जनताही कायम रेल्वे अधिकाऱ्यांची ऋणी राहील, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
फलटणच्या रेल्वेसाठी संपूर्ण हयातभर संघर्ष करणारे दिवंगत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे नाव फलटण-पुणे रेल्वेला देण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांनी जरूर प्रयत्न करावेत. रेल्वे हे विकासाचे दालन असून गोरगरीब जनता, विद्यार्थी यांना प्रवासासाठी रेल्वे फायदेमंद आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी कराड-सातारा- पुणे अशी लोकल सेवा सुरु करण्यासाठीही प्रयत्न करावेत. तसेच सातारा जिल्ह्यातील रेल्वेचे प्रलंबित सर्व प्रश्न सोडवावेत, असे आवाहन खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी करून रेल्वेसेवा सुरू झाल्याबद्दल फलटणच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |